• Download App
    संतापजनक : राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर मशिद, हिरवा चांद आणि बकरा!!|Outrageous: Masjid, green moon and goat on Vithuraya's photo on NCP's calendar!!

    संतापजनक : राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर मशिद, हिरवा चांद आणि बकरा!!

    प्रतिनिधी

    नागपूर : एरवी महाराष्ट्रात पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता “पुरोगामित्वाची” सगळी हद्द ओलांडली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याच्या एका कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर बकरा आणि हिरवा चांद छापण्याची हिमाकत राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीचे नागपूरमधील नेते दुनेश्वर सूर्यभान पेठे यांच्या कॅलेंडरवर जून महिन्यात येणाऱ्या आषाढी एकादशी आणि बकरी ईद यांचे एकत्रित चित्र छापले आहे. प्रत्यक्ष विठुरायाच्या मुखावर येईल, अशा पद्धतीने हिरवा चांद, मशिद आणि बकरा असा फोटो छापला आहे.Outrageous: Masjid, green moon and goat on Vithuraya’s photo on NCP’s calendar!!



    या कॅलेंडरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महाराष्ट्रभरातून त्याविषयी प्रचंड संताप उसळला आहे. एरवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवतात. पण मुस्लिम लांगुलचालनाची एकही संधी सोडत नाहीत.

    पण आता त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या फोटोवरच मशिद, हिरवा चांद आणि बकरा यांचे फोटो छापण्याचा घृणास्पद प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

    भाजपने या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांना हेच का तुमचे पुरोगामीत्व??, असा परखड सवाल केला आहे.

    Outrageous: Masjid, green moon and goat on Vithuraya’s photo on NCP’s calendar!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना