• Download App
    एकतर्फी प्रेमातून दहावीच्या मुलीवर चाकूने खुनी हल्ला|Out of one sided love, a tenth grader was stabbed to death

    एकतर्फी प्रेमातून दहावीच्या मुलीवर चाकूने खुनी हल्ला

    एकतर्फी प्रेमातून पुण्यातील वडगाव शेरी भागातील दहावीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर घटनेनंतर आरोपीने ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.


    प्रतिनिधी

    पुणे – दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून शाळेच्या आवारातच चाकूने वार करण्यात आला. ही घटना वडगावशेरी भागात सोमवारी घडला. यामुळे शाळेच्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान याप्रकरणा नंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.One side love २२yrs youth attacked on १०th standard girl in Vadgaonsheri Area

    मंगळवारपासून (दि.15) दहावीच्या परिक्षा सुरु होणार आहेत. यामुळे शाळेत आज निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यासाठी पिडीत मुलगी शाळेत आली होती.मुलीवर वार केल्यानंतर त्या मुलानेदेखील विष प्राशन केले. कपील भट्ट (22 ) असे हल्ला करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.



    ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वडगावशेरी परिसरातील ईनामदार शाळेसमोर घडली आहे.पिडीत मुलीच्या शाळेतील दहावीचा निरोप समारंभ होता. यावेळी आरोपी शाळेच्या आवारात घुसला आणि त्याने काही कळायच्या आतच मुलीवर चाकूने सपावप वार केले. हा प्रकार बघुन विद्यार्थ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले . शाळेतील कर्मचारी आणि शिक्षणांकांनी घटनास्थळी धाव घेतली. शालेय प्रशासनाने तातडीने पोलिसांना खबर दिली.

    पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमीक माहितीनुसार, मागील दिड महिन्यापासून आरोपी मुलगा मुलीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता. पूर्वी दोघे एकाच परिसरात वास्तव्यास होते. तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकारात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    हा प्रकार घडल्यानंतर आरोपी मुलाने तेथून पळ काढला होता. नंतर त्याने विषप्राशन केल्याची माहिती असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनेचीमाहीती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

    Out of one sided love, a tenth grader was stabbed to death

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस