• Download App
    ‘’आमचे गृहमंत्री "फडतूस" नाही "काडतूस" आहेत!’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवारOur Home Minister is not Fadtoos but Kadtoos Ashish Shelar response to Uddhav Thackerays criticism

    ‘’आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस” आहेत!’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार

    ”आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो की कद्रु मनाने फडतूस कारभाराचे जनक होऊ नका.!” असंही शेलारांनी म्हटलं आहे.

    ‘’ज्या क्षणी महाराष्ट्र सरकार उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच संरक्षण कमी करेल त्या क्षणापासून …’’ असं आमदार नितेश राणे  यांनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असं म्हटल्याने, आता राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे दिसत आहे. भाजपाने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांची  प्रतिक्रिया समोर आली आहे. Our Home Minister is not Fadtoos but Kadtoos Ashish Shelar response to Uddhav Thackerays criticism

    आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटले की, ‘’आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस” आहेत! मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिला. कोणत्याही मारहाणीचे समर्थन होत नाही, आम्ही ते करणारही नाही. पण या अशा खुनशी कारभाराची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांनीच रोवली.’


    ‘’चाणक्य जे म्हणाले तेच आता खरं होतंय’’ उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडवणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’!


    याचबरोबर, ‘’निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यापासून, पत्रकारांना घरात घुसून अटक करण्यापर्यंत, लोकांची घरे तोडणे, खोटे गुन्हे दाखल करणे, केंद्रीय मंत्र्यांना अटक करणे. हे फडतूस उद्योग कुणी केले उध्दवजी? आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो की कद्रु मनाने फडतूस कारभाराचे जनक होऊ नका.!’’ असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

    मच्छर मारायची हिंमत नसलेल्यानी… – नितेश राणेंचे टीकास्त्र

    ‘’ज्या क्षणी महाराष्ट्र सरकार उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच संरक्षण कमी करेल त्या क्षणापासून ते घराच्या बाहेर निघणार नाहीत. मच्छर मारायची हिंमत नसलेल्यानी आमच्या देवेंद्रजींना फडतूस बोलायची हिंमत करू नये.  यापुढे चड्डीत राहायचं आणि लायकीप्रमाणे बोलायचं..!!!’’ अशा शब्दांत भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

    उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? –

    “एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

    Our Home Minister is not Fadtoos but Kadtoos Ashish Shelar response to Uddhav Thackerays criticism

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ