• Download App
    ओबीसींच्या संतापावर आव्हाडांचे "...अन्यथा जय भीम"ने उत्तर; त्यांना नेमके सुचवायचेय काय...?? । "... otherwise Jai Bhim" responds to OBC's anger; What exactly do you want to suggest to them ... ??

    ओबीसींच्या संतापावर आव्हाडांचे “…अन्यथा जय भीम”ने उत्तर; त्यांना नेमके सुचवायचेय काय…??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ओबीसींवर विश्वास नाही. मंडल आयोगाच्या लढाईच्या वेळेला ते मागे सरले. लढले नाहीत, असे उद्गार राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काढल्यावर महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये मध्ये संतापाची लाट आहे. अनेकांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले आहे आहे. “… otherwise Jai Bhim” responds to OBC’s anger; What exactly do you want to suggest to them … ??

    या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. ओबीसी समाज आपल्या घरावर मोर्चा काढणार आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढवावा… अन्यथा जय भीम, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पण या प्रत्युत्तरातून त्यांना नेमके काय सुचवायचे आहे…??, याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

    जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले. ते असे : उद्या (आज) माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा……. जय भीम!

    या ट्विट मधून जितेंद्र आव्हाड यांना नेमके काय सुचवायचे आहे? ओबीसी समाजावर त्यांचा विश्वास नाही, असे त्यांनी वक्तव्य केले आहे त्यावर ते ठाम दिसत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा असे ते सरकारमध्ये राहूनच सांगताहेत. याचा नेमका राजकीय अर्थ काय आहे? आणि …अन्यथा जय भीम!, याचा राजकीय अर्थ काय होतो? या विषयाची चर्चा राजकीय वर्तुळात बरोबरच सोशल मीडिया देखील सुरू आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड समर्थक आणि विरोधक हिरिरीने प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

    “… otherwise Jai Bhim” responds to OBC’s anger; What exactly do you want to suggest to them … ??

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    Icon News Hub