• Download App
    ठाकरे घराण्यात उद्धव एकाकी; एकनाथ शिंदेंभोवती जमू लागला अन्य ठाकरे परिवार!!; स्मितानंतर निहार ठाकरे यांची भेट Other Thackeray family started gathering around Eknath Shinde!!; Meet Nihar Thackeray after Smita

    ठाकरे घराण्यात उद्धव एकाकी; एकनाथ शिंदेंभोवती जमू लागला अन्य ठाकरे परिवार!!; स्मितानंतर निहार ठाकरे यांची भेट

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या बलाढ्य राजकीय ठाकरे घराण्यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता एकाकी पडत चालले आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भोवती आता बाकीचा ठाकरे परिवार जमू लागला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई आणि जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. Other Thackeray family started gathering around Eknath Shinde!!; Meet Nihar Thackeray after Smita

    आता आज स्वर्गीय बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी राजकीय चर्चा केली आहे. निहार ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत असे नाही, तर ते भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जावई देखील आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्याशी निहार ठाकरे यांचा 2021 मध्ये विवाह झाला आहे. पेशाने वकील असलेल्या निहार ठाकरे यांनी आत्तापर्यंत स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले होते. मातोश्रीपासून देखील ते दूरच होते. परंतु, आता एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निहार ठाकरे यांनी आपला राजकीय मनसुबा व्यक्त केला आहे. पत्नी अंकिता सासरे हर्षवर्धन पाटील यांचाही त्यांना भक्कम पाठिंबा आहे.

    शिवसेनेत राजकीय वर्चस्व बरोबर ठाकरे घराण्यात अंतर्गत वाद देखील मोठा आहे उद्धव ठाकरे यांच्यापुढे बाकीचे ठाकरे सुरुवातीला निष्प्रभ ठरले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा आपण एकटेच चालवणार असे उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांपासून एस्टॅब्लिश केले होते. परंतु ठाकरे घराण्यातल्या वादाच्या काही बातम्या अधून मधून प्रसार माध्यमांमध्ये येतच होत्या. आता मात्र उघडपणे स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली राजकीय वाटचाल त्यांच्याबरोबर सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. यातून बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा आता फक्त उद्धव ठाकरे यांच्या एकट्याकडेच उरलेला नाही हेही हळूहळू स्पष्ट होणार आहे.

    Other Thackeray family started gathering around Eknath Shinde!!; Meet Nihar Thackeray after Smita

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!

    सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये; राज आणि उद्धव हजर, पण पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र गैरहजर, बैठकीचे महत्त्व राहिलेच काय??

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण