विशेष प्रतिनिधी
पुणे : समीर वानखेडे हा माझा जावई नाही आणि भाजपचादेखील जावई नाही. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात जे सुरू आहे ते सुरू राहावं; परंतु सर्वसामान्य माणूस हा वानखेडे यांच्या मागे उभा आहे, असा इशारा भारतीय जनता जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.Ordinary man standing behind Sameer Wankhede, Chandrakant Patil’s warning
आर्यन खान अटक प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याख विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ विरोधी विभागाचे (एनसीबी)विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यावरून नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो, अशी टीका करत पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणूस वानखेडे यांच्या मागे उभा आहे.
मलिकांनी जास्त टेस्ट घेऊ नये. कारण समाज हा नेहमी ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या पाठीशी असतो, हे ध्यानात ठेवावे.’पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त’ या ट्वीटबद्दल बोलताना नवाब मलिक म्हणाले होते की, गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी बोगस केस तयार करून कारवाई करत आहेत.
समीर वानखेडे यांनी जबाबदारी स्वीकारल्या नंतर बोगस केस तयार करून पब्लिसिटी करीत होते. पण नंतर हळूहळू हा फजीर्वाडा आम्ही समोर आणला. किरण गोसावीच्या सेल्फीनंतर एकएक बाजू उघडत गेली आणि जे आज बाहेर होते ते जेलमध्ये आहेत. यापुढेही एनसीबीची पोलखोल करत राहणार आहे.
Ordinary man standing behind Sameer Wankhede, Chandrakant Patil’s warning
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे
ReplyReply allForward
|