• Download App
    ORANGE ALERT: चार दिवस पुन्हा कोसळधार ; पुन्हा रूद्रावतार;कोकण गोव्यासाठी IMD ने दिला Orange Alert। ORANGE ALERT: Four days again collapse; Rudravatar again; IMD issued Orange Alert for Konkan Goa

    ORANGE ALERT: चार दिवस पुन्हा कोसळधार ; पुन्हा रूद्रावतार;कोकण गोव्यासाठी IMD ने दिला Orange Alert

    • कोकण आणि गोव्यात 30 आणि 31 जुलैला मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. ORANGE ALERT: Four days again collapse; Rudravatar again; IMD issued Orange Alert for Konkan Goa

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्रात पावसाने अतोनात नुकसान झाल्यानंतर आता पुन्हा एकदा निसर्गाचा रूद्रावतार दिसणार आहे .कोकण आणि गोव्यासाठी 30 आणि 31 जुलैला ऑरेंज अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा अलर्ट देण्यात आला आहे. IMD ने हा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. एवढंच नाही तर पुढचे पाच दिवस हे पावसाचे असणार आहेत असंही सांगण्यात आलं आहे.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच कोकण आणि गोवा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान पश्चिमेचे वारे वेगाने वाहतील, त्यामुळे कोकण आणि गोव्यात संततधार राहिल असं पुणे हवाम खात्याचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे.



    ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

    नैसर्गिक आपत्ती ही कोणत्याही क्षणी येऊ शकते, येणाऱ्या संकटासाठी लोकांनी तयार असावं म्हणून हा अलर्ट जारी करण्यात येतो. या कालावधीत वीज पुरवठा खंडीत होणं, वाहतूक ठप्प होणं घडू शकतं. पुढच्या संकटाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ऑरेंज अलर्ट देण्यात येतो. गरज असेल आणि अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं या अलर्टमध्ये सांगण्यात येतं.

    एवढंच नाही तर आयएमडीने म्हणजेच भारतीय हवामान खात्याने पुढचे चार दिवस पावसाचे असतील असंही स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने महाराष्ट्रात दाणादाण उडवली.

    ORANGE ALERT: Four days again collapse; Rudravatar again; IMD issued Orange Alert for Konkan Goa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!