विशेष प्रतिनिधी
येवला : राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या मंत्री पदासोबतच नाशिकचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ आज जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोना रूग्णांच्या सतत वाढणार्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचप्रमाणे त्यांनी लोकांना इशाराही दिला आहे की, जर लोकांनी कोरोना संदर्भात नियम पाळले नाहीत तर तालुक्यात पुन्हा लॉक डाऊन लागू करण्याचा करण्यात येईल. लॉक डाऊन टाळायचा असेल तर नियमांचं काटेकोरपणे पालन करने गरजेचे आहे. असे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.
‘Or else lockdown may happen once again ..’ : chagan bhujbal
राज्यात मंदिरे चालू झाली आहेत, शाळा चालू होतायत, त्यामुळे कोरोना नियमांचे हळूहळू पालन करण्याचे लोक विसरत चालले आहेत. लसीकरणाचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. अशावेळी पुन्हा तिसरी लाट येऊ नये यासंदर्भात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, असेदेखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ : कोरोना संकट दूर होऊ दे ; सप्तश्रृंगी चरणी केली प्रार्थना
सर्व काळजी घेऊनदेखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इथे व्हॅक्सिनचा पुरवठा वाढलेला आहे. लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. कार्यकर्ते लोकांना बोलावून लसीकरण करत आहे. त्यामुळे थोडा आधार मिळतच आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे.
‘Or else lockdown may happen once again ..’ : chagan bhujbal
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल