• Download App
    Opposition's hara-kiri in municipal elections; But BJP's enthusiasm for "self-goals" is strong!महापालिका निवडणुकांमध्ये विरोधकांची हाराकिरी; पण भाजपवाल्यांना "सेल्फ गोल" करण्याची हौस लै भारी!!

    महापालिका निवडणुकांमध्ये विरोधकांची हाराकिरी; पण भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस लै भारी!!

    municipal elections

    नाशिक : महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी हराकरी केली, पण त्याचवेळी भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस भारी ठरली.Opposition’s hara-kiri in municipal elections; But BJP’s enthusiasm for “self-goals” is strong!

    29 महापालिकांमध्ये महाविकास आघाडीने एकवटून निवडणुका लढवलेली नाही. उलट सर्वच्या सर्व महापालिकांमध्ये सगळे विरोधक विस्कटलेल्या अवस्थेत निवडणूक लढवताना दिसतात. त्यामुळे भाजप समोर विरोधकांचे कुठले आव्हानच नाही. मुंबईत ठाकरे बंधू, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका – पुतणे या दोन राजकीय घराण्यांनीच भाजपकडे थोडेफार आव्हान निर्माण केले. काँग्रेसवाले तर यात फार मागे पडले, पण असे असताना सुद्धा भाजपवाल्यांनी सरळपणे स्वतःची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून “सेल्फ गोल” करण्यात “धन्यथा” मानली.

    – “सेल्फ गोल”ची उदाहरणे

    या “सेल्फ गोलची” अनेक उदाहरणे या महापालिका निवडणुकांमध्ये समोर आली. आधी भाजपने अकोट आणि अंबरनाथ मध्ये असंगाशी संग केला. भाजपवाल्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाशी युती केली. काँग्रेसशी आघाडी केली. भाजपच्या स्थानिक नेत्यांना सत्तेची एवढी घाई झाली होती, की आपण राज्यात भाजपचे नुकसान करतो आहोत याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही. अंबरनाथ आणि अकोट मधली राजकीय आघाडी देवेंद्र फडणवीस यांना मोडून काढावी लागली. कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या अभद्र आघाडीची दखल घेतली, पण तिथे सुद्धा भाजपचा “सेल्फ गोलच” झाला. कारण प्रदेशाध्यक्ष करूनही रवींद्र चव्हाण स्थानिक पातळीवर नेते राहिले. अंबरनाथ मध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता घालविण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक फोडले. ते भाजपमध्ये घेतले, पण बहुमताचा आकडा मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत. उलट एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांनाच धोबीपछाड दिला. शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक शिवसेनेशी जोडून घेतले आणि अंबरनाथ मध्ये बहुमत सिद्ध केले. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांची फक्त काँग्रेस फोडण्याची हौस भागली, पण त्यांना अंबरनाथची सत्ता मिळू शकली नाही. उलट रवींद्र चव्हाणांमुळे अंबरनाथ मध्ये भाजपचा “सेल्फ गोल” झाला.



    – लातूरमध्ये “सेल्फ गोल”

    त्याच्या आधी रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये जाऊन विलासराव देशमुख यांची आठवण पुसायचा प्रयत्न केला. वास्तविक रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या प्रदेश पातळीवरच्या नेत्याला काय बोलावे आणि काय बोलू नये, याचे भान असायला हवे होते, पण ते भानच त्यांना उरले नाही. भाषणाची हौस भागवून घेण्याच्या नादात त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा आहे की लातूरातून विलासरावांची आठवण पुसली जाईल, असे वक्तव्य केले. त्यामुळे लातूरमध्ये भाजप विरुद्ध संताप उसळला. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना लातूरमध्ये जाऊन त्यावर खुलासा करावा लागला. विलासरावांची आठवण कोणी पुसू शकत नाही, असे म्हणावे लागले. रवींद्र चव्हाण यांना सुद्धा दिलगिरी व्यक्त करावी लागली, पण एवढे होऊन सुद्धा लातूरमधल्या भाजपचा “सेल्फ गोल” टळला नाही.

    – तुषार आपटे प्रकरणात “सेल्फ गोल”

    भाजपच्या नेत्यांनी आणखी एक “सेल्फ गोल” केला भाजपने बदलापूर मध्ये बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणातला सह आरोपी तुषार आपटे याला स्वीकृत सदस्य केले भाजपचे आमदार किसन कठोरे यांचा निकटवर्ती म्हणून तुषार आपटे ला स्वीकृत सदस्य पदाची बक्षीस देण्यात आली वास्तविक तुषार आपटे बालिका लैंगिक प्रकरणात सह आरोपी आहे. तो ज्या संस्थेचा सदस्य आहे, त्या संस्थेतच बालिका लैंगिक अत्याचार प्रकरण घडले. त्यामुळे बदलापुरात प्रचंड संताप उसळला होता. लाखो नागरिकांनी रेल्वे आणि रस्ते बंद पाडले होते. त्या प्रकरणातला मुख्य आरोपी शिंदे याचा एन्काऊंटर झाला होता. तुषार आपटे याला अटक झाली होती. पण सध्या तो जामिनावर बाहेर आला. त्याने बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठी मदत केल्याचे सांगितले गेले, म्हणून त्याला स्वीकृत नगरसेवक पदाची बक्षीस दिली. पण ती भाजपवरच उलटली. कारण त्याच्याविरुद्ध बदलापुरात पुन्हा एकदा संताप उसळून आला. महापालिका निवडणुकांच्या मध्यावर बदलापूर मध्ये मनसेने मोठा मोर्चा काढायची तयारी केली. त्यामुळे भाजपला माघार घ्यावी लागली. ज्यांनी चूक केली, त्यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांना द्यावे लागले. त्यानंतर तुषार आपटेचा पक्षाला राजीनामा सुद्धा घ्यावा लागला.

    वास्तविक तुषार आपटेला भाजपला वेगळ्या प्रकारे काही बक्षीस देता आले असते पण त्याला स्वीकृत नगरसेवक करून भाजपने “सेल्फ गोल” केला. भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात स्वबळाची हौस आली म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांना दुखावले. त्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि AIMIM पक्षाशी सुद्धा आघाडी केली, पण प्रत्यक्षात बहुमत गाठताना आल्याने सत्ता सुद्धा गमवावी लागली, शिवाय भाजपची राज्यभरात नाचक्की ती झाली ती अलगच!!

    Opposition  hara-kiri in municipal elections; But BJP’s enthusiasm for “self-goals” is strong!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नको बारामती, नको भानामती; पिंपरी चिंचवड मध्ये आठवण पार्थच्या पराभवाची!!

    दादा – ताईंच्या ऐक्यात प्रफुल्ल पटेलांची पाचर; केंद्रातल्या सत्तेच्या खुर्चीसाठी “पवार संस्कारितांची” तडफड!!

    मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन