विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे मुस्लिम मतांचे लांगुलचालन, तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एआयएमआयएम पक्षाला विरोध असा सध्या भाजप विरोधकांचा राजकीय संभ्रम आहे. Opposition parties wants 100 % Muslim vote share, but opposed AIMIM into their unity efforts
देशातले सगळे भाजप विरोधक मुसलमानांची एकजूट करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यात प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर गेलेले उद्धव ठाकरेही अपवाद नाहीत. शरद पवार, प्रकाश आंबेडकर, लालूप्रसाद यादव, दिग्विजय सिंह या सर्व नेत्यांना मोदींना हरविण्यासाठी मुस्लिमांची एकजूट घडवायची आहे. किंबहुना मुसमानांचे 100 % मतदान घडवून मोदीविरोधात एकगठ्ठा मतदान करविण्याची या सर्व नेत्यांची महत्त्वकांक्षा आहे. पण ही महत्त्वाकांक्षा जोपासतानाच खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम पक्ष त्यांना अडथळा वाटतो आहे. कारण ओवैसी यांनी विरोधकांच्या मुस्लिम एकजुटीच्या प्रयत्नांनाच सुरुंग लावला आहे. मुंबईत आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन भरून तथाकथेच धर्मनिरपेक्ष पक्षांना एक्सपोज केले आहे.
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन मुंबईत झाले. या अधिवेशनात खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लीम समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. पक्षाने मंजूर केलेल्या १६ ठरावांमध्ये मुस्लिमांच्या प्रश्नांवरच भर होता. मुस्लीम आरक्षणापासून समान नागरी कायदा, लव्ह जिहाद, हिंदू राष्ट्राला विरोध, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुरू असलेली चर्चा, वफ्क बोर्डाच्या जागा अशा विविध प्रश्नांचा समावेश होता. ओवैसी यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांना घेरले. भाजप विरोधकांना मुसलमानांची फक्त मते हवी असतात. मुसलमानांच्या कल्याणाशी या पक्षांना काहीही देणे घेणे नाही, हा असदुद्दीन ओवैसी यांचा फक्त आरोप नाही, तर गेल्या काही वर्षांमधली ही त्यांची ठाम भूमिका आहे. त्यासाठी ते नेहमीच काँग्रेस सह इतर सर्व तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या इतिहासाचे दाखले देतात. मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांचा वापर करून सत्तेवर आलेल्या पक्षांनी कधीच मुस्लिमांना आरक्षण दिले नाही, यावर ओवैसी यांचा कायम कटाक्ष राहिला आहे.
मुस्लिमांचा एकमेव तारणहार पक्ष अशी एआयएमआयएमची प्रतिमा तयार करण्यावर ओवैसी यांचा भर आहे. पक्षाच्या जाहीर सभांसाठी मुंब्रा आणि मालाड – मालवणीची निवड केली होती. यात त्यांचे राजकीय चातुर्य दिसून आले.
निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्यासह काही मुस्लीम समाजातील बुद्धीवादी तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी संघाशी चर्चा सुरू केली. यापैकी काही जणांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यावर ओवैसी यांनी जोरदार टीका केली. संघाशी चर्चा किंवा वाटाघाटी करण्यावर सर्वसामान्य मुसलमानांचा कायम विरोध असतो असा ओवैसी यांचा दावा आहे. या मुद्द्यावर आपल्या पक्षाचा “व्होटर बेस” वाढविण्याकडे ओवैसी यांचा कल आहे.
आणि नेमके येथेच ओवैसी आणि वर उल्लेख केलेले सर्व भाजप विरोधी नेते यांच्यात मतभेदांची दरी रुंदावते. ओवैसींचा पक्ष जेवढा आपला व्होटर बेस पक्का करेल, त्यापेक्षा दुप्पट धक्का काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बाकीच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या व्होटर बेसला बसतो ही सर्व धर्मनिरपेक्ष नेत्यांची मूलभूत भीती आहे आणि म्हणूनच त्यांना मुसलमानांची एकजूट तर हवी आहे. पण त्यांच्याच समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असदुद्दीन ओवैसींचा पक्ष नको आहे.
महाराष्ट्रात ओवैसींच्या कडवट प्रचाराला राज्यातील मुस्लीम समाज कितपत पाठिंबा देईल यावर फक्त ओवैसींच्याच पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल असे नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, प्रकाश आंबेडकर या सगळ्यांचे राजकीय भवितव्य ओवैसींच्या मतांच्या टक्केवारीवर अवलंबून असेल. हेच प्रकाश आंबेडकर, शरद पवार, उद्धव ठाकरे आदी नेत्यांचे “राजकीय दुखणे” आहे!! मुसलमानांच्या 12% एकगठ्ठा मतांवर या सगळ्या नेत्यांना 100 % महाराष्ट्रावर राज्य करायचे आहे!!
एआयएमआयएमचे राज्याचे प्रमुख इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार आहेत. याशिवाय मालेगाव आणि धुळ्यात पक्षाचे आमदार आहेत. नांदेड, अमरावतीसह काही ठराविक शहरांमघ्येच एमआयएमला यश मिळाले. बाकी महानगरकपालिकांमध्ये दोन तीन नगरसेवकांचा अपवाद वगळता एमआयएमला तेवढे यश मिळालेले नाही. राज्यात मुस्लीम समाज एमआयएमच्या आक्रमक आणि जहाल भूमिकेला पाठिंबा देत नाही, असे काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांचे म्हणणे आहे. एमआयएम जिंकण्यापेक्षा मतांच्या विभाजनाची भूमिका बजावते. याचा साहजिकच भाजपला फायदा होतो. काँग्रेस व राष्ट्रवादीला त्याचा फटका बसतो, असे निरीक्षण त्यांनी मांडले आहे. पण ओवैसींना रोखण्यासाठी प्रभावी उपाय कोणता?, हे मात्र कोणाला सांगता येत नाही.
तेलंगणात पाळेमुळे असलेल्या एमआयएमला उत्तर भारतात फारसा पाठिंबा मिळत नाही. आसाममध्ये एमआयएमने निवडणूक लढविलीच नव्हती. बिहारमध्ये सीमांचलमध्ये मुस्लीमबहुल भागात पक्षाचे 5 आमदार निवडून आले होते. त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला बसला होता. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश निवडणुकीत एमआयएमची कामगिरी निराशाजनक झाली होती. यामुळे ओवैसींना महाराष्ट्रात कितपत पाठिंबा मिळेल?, याबाबत वास्तवात शंका आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि आंबेडकर यांना धोका मात्र मोठा वाटतो आहे. त्यामुळेच त्यांनी मुसलमानांच्या 100 % टक्के मतदान घडविण्याच्या मोहिमेला चालना दिली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी हे या मोहिमेतले डोंगराएवढे स्पीड ब्रेकर आहेत!!
Opposition parties wants 100 % Muslim vote share, but opposed AIMIM into their unity efforts
महत्वाच्या बातम्या
- सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा फडणीसांकडून निषेध; पण उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल!!
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना दारू घोटाळ्यात सीबीआय कडून अटक!!; 10000 कोटींच्या उत्पादन शुल्काची अफरातफर
- चहात सोन्याचे पाणी घालता का??, अजितदादांचा सवाल; 70 हजार कोटी पाण्यात घातलेत त्याचा हिशेब दिला का??, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर