विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपूर मध्ये औरंगजेब समर्थकांनी केलेल्या दंगलीची मणिपूरच्या दंगलीशी तुलना करून महाराष्ट्रात मणिपूर करायची भीती विरोधकांनी दाखवली पण यातून औरंगजेबाची कबर वाचवायची त्यांची तयारीच उघड दिसली.
नागपूरच्या दंगलीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना आदित्य ठाकरे यांनी मणिपूरचा संदर्भ दिला. भाजपला महाराष्ट्रात मणिपूर घडवायचे. तिथे जसे कोणाला मारले कोणाला जाळले, ते बरेच दिवस बाहेर आले नाही. तिथे हिंसाचार माजलाय. आता तिथे कोणी पर्यटक जातात का किंवा गुंतवणूक जाते का, तर त्याचे उत्तर “नाही” असे आहे. भाजपला महाराष्ट्रात देखील मणिपूर सारखीच स्थिती आणायची आहे. जिथे भाजपला राज्य करता येत नाही, तिथे दंगली घडवून राज्य अस्थिर करण्याचे काम तो पक्ष करतो. नागपुरात काल तेच दिसले.
वास्तविक नागपुरातल्या घटनेची आधीच माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला मिळायला पाहिजे होती. मी मुख्यमंत्री कार्यालयाचे काम जवळून पाहिले आहे तिथे ताबडतोब माहिती मिळते एक अहवाल येतो पण फडणवीस यांच्या नागपूर शहरात दंगल होऊन देखील काल मुख्यमंत्री कार्यालयाने कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही हे सगळे संशयास्पद आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना भास्कर जाधव, अंबादास दानवे या दोन विरोधी पक्ष नेत्यांनी दुजोरा दिला. पण सगळ्या नेत्यांनी औरंगजेबाची कबर उखडायची जबाबदारी राज्य सरकारवरच टाकून दिली. औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या राजवटीत आर्केएलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने संरक्षण दिले पण त्याची जबाबदारी आता भाजप सरकारवर टाकून विरोधक मोकळे झाले.
औरंगजेबाच्या कबरीला सरकार आणि विरोधकांनी एकमुखाने विरोध दाखवण्याच्या ऐवजी सर्व विरोधकांनी महाराष्ट्रात मणिपूर करायची भीती दाखवून औरंगजेबाची कबर वाचवायचीच अप्रत्यक्ष भूमिका घेतली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तर औरंगजेबाची कबर उखडून फेकायला विरोध केला. त्याऐवजी नागपुरातल्या दंगलींच्या मुद्द्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला.
Opposition parties come forward to save Aurangzeb grave
महत्वाच्या बातम्या