विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर विरोधक दगड घेऊन रस्त्यावर!!, हा दिल्ली चिपळूण आणि नांदेड मधल्या घटनांचा कॉमन फॅक्टर आहे. Opposers on the streets with stones ahead of the election
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी काल चिपळूण मध्ये भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे शहरात प्रचंड तणाव वाढला. दोन्ही बाजूच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले चिपळूण मध्ये आजही राजकीय तणाव आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही!!
दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलकांच्या हातात आजही दगड आहेत शंभू बॉर्डरवर काही शेतकरी आंदोलकांनी पोलीस आणि सीआरपीएफ च्या जवानांवर दगडफेक केली त्यांनी शेतकरी आंदोलकांवर कारवाई करावी यासाठी शेतकऱ्यांनीच चिथावणी दिली. राम मंदिराच्या निर्मितीनंतर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा ग्राफ वर गेला आहे. तो खाली आणण्यासाठी आंदोलन करत असल्याचे शेतकऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
नांदेड मध्ये मराठा आंदोलकांनी काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी फोडली मोहन हंबर्डे पिंपळगाव निमजी या कार्यक्रमाचे काकीर्तनाच्या कार्यक्रमाला गेले असताना त्यांची गाडी फोडली. मोहन हंबर्डे हे अशोक चव्हाण यांचे समर्थक आहेत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे आणखीही समर्थक आमदार भाजपमध्ये येऊ शकतात. त्यात मोहन हंबर्डे यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मोहन हंबर्डे यांची गाडी फोडण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे केंद्रातल्या मोदी सरकारला हरवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन इंडिया आघाडी बनवली, पण काँग्रेसचे मित्र पक्षच त्या आघाडीतून एकापाठोपाठ एक बाहेर पडत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या इकोसिस्टीम मधील म्होरक्यांना प्रचंड फ्रस्ट्रेशन आले आहेत आणि ते फ्रस्ट्रेशन हातातले दगड रस्त्यावर फेकून काढले जात आहे.
Opposers on the streets with stones ahead of the election
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांना भारत भेटीचे निमंत्रण दिले, 8 भारतीयांच्या सुटकेवर म्हणाले…
- हल्दवानीत प्रशासनाचा बडगा; हिंसाचाराचा मास्टरमाईंड अब्दुल मलिककडून होणार 2.44 कोटींची वसुली; 127 शस्त्रपरवाने रद्द!!
- लंडनच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार
- ..अखेर मिमी चक्रवर्ती यांनी खासदारकी सोडण्याची केली घोषणा!