• Download App
    सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि सन्मान फक्त भाजपमध्येच; विजया रहाटकरांनी व्यक्त केली कृतज्ञता|Opportunity and respect for common worker only in BJP

    सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि सन्मान फक्त भाजपमध्येच; विजया रहाटकरांनी व्यक्त केली कृतज्ञता

    प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि सन्मान फक्त भाजपमध्येच मिळू शकतो, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी फेरनियुक्तीनंतर विजया रहाटकर यांची पक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
    भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा जी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शहा जी यांचे मी मनापासून आभार मानते, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.Opportunity and respect for common worker only in BJP



    छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद संपल्यापासून मी गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीमध्ये विविध स्वरूपाच्या राष्ट्रीय जबाबदाऱ्या सांभाळत आहे. भाजप महिला मोर्चाची पहिल्यांदा राष्ट्रीय सरचिटणीस, नंतर सलग दोनदा राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपची राष्ट्रीय सचिव, दादरा नगर हवेली दीव दमणची प्रभारी, राजस्थानसारख्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण राज्याची सहप्रभारी अशा विविध जबाबदाऱ्या पक्षाने माझ्यावर सोपविल्या. श्री अमित शहा आणि श्री. जे पी नड्डा यांच्या टीममध्ये सलग 10 वर्षे काम करण्याचा मानही मला मिळाला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली पक्षाच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली. याबद्दल मी पक्षाची सदैव ऋणी राहीन, असा कृतज्ञता भाव विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.

    कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय पातळीवर सलग १२ वर्षे काम करण्याची संधी मिळू शकते, हे फक्त आणि फक्त भाजपमध्येच घडू शकते. माझ्यावर पक्षाने पुन्हा टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी मी समर्पित भावनेने सदैव मेहनत करत राहीन, अशी ग्वाही देखील विजया रहाटकर यांनी दिली आहे.

    Opportunity and respect for common worker only in BJP

    महत्वाच्या बातम्या 

     

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा