विशेष प्रतिनिधी
बीड : ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जाती विषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे, कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही, लोकप्रतिनिधींनी आता मराठा समाजाला वेठीस धरू नये. सगळ्या पुढाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.Only to eliminate caste inequality This is my fight: Sambhaji Raje
ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की मी शिव आणि शाहूंचा वंशज आहे, अठरा पगड जातीला एकत्र करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. ओबीसीला दुखावून मी कोणतही काम करू शकत नाही. त्यामुळं मी तसं बोललो पुढाऱ्यांनी आता समाजाला फसवू नये जे खर आहे. ते सांगावं 102 व्या घटना दुरूस्तीचे राज्याचे अधिकार संपुष्टात आले आहेत.
- अठरा पगड जातीला एकत्र करण्यासाठी संवाद यात्रा
- जाती विषमता दूर करण्यासाठीच माझा हा लढा
- ओबीसीला दुखावणारे काम करणार नाही
- पुढाऱ्यांनी आता समाजाला फसवू नये
- आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे
- मी शिव आणि शाहूंचा वंशज आहे
Only to eliminate caste inequality This is my fight: Sambhaji Raje