विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या राजकीय वयाच्या पंचविशीत प्रवेश करत असताना राजधानी नवी दिल्लीतल्या छोटेखानी कार्यक्रमात कार्यक्रमात मुख्य पोस्टरवर संस्थापक खासदार शरद पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबरच संसदीय दलाच्या नेत्या म्हणून सुप्रिया सुळे यांचेच फोटो लागलेले दिसले. त्याच वेळेस स्टेजवर बाकीच्या नेत्यांबरोबरच महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते अजितदादा पवारही दिसले. पण सुप्रिया सुळे मात्र या कार्यक्रमात दिसल्या नाहीत. Only Supriya’s poster with Pawar, Patel at the event in Delhi, Ajitdada on stage
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्य सत्कार नागालँड मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आलेल्या 7 आमदारांचा करण्यात आला. या आमदारांनी शरद पवारांसाठी खास नागालँडची पारंपारिक वेशभूषा आणली होती. ती या आमदारांनी शरद पवार यांना प्रदान केली.
पण या कार्यक्रमातली मुख्य चर्चा मात्र शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या बरोबरीने पोस्टरवर फक्त सुप्रिया सुळे यांचा फोटो लावल्याची रंगली.
गेल्याच महिन्यात शरद पवारांच्या विस्तारित आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी अचानक निवृत्ती नाट्य घडवून आणले. त्यामुळे शरद पवारांचा नेमका राजकीय वारस कोण?, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी वारस या विषयाची चर्चा थांबलेली नाही. या पार्श्वभूमीवर अजित पवार स्टेजवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या पोस्टरवर शरद पवार प्रफुल्ल पटेल यांच्या बरोबरीने फक्त सुप्रिया सुळे यांचे पोस्टर लागणे त्याला विशेष महत्त्व आहे. यातून पवारांनी राष्ट्रीय पातळीवर आपला वारस निश्चित केल्याचे मानले जात आहे.
पण त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापन दिनाचा राजधानीतला कार्यक्रम पक्ष कार्यालयाच्या आवारात छोटेखानी का घेतला?, याविषयी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवाय या कार्यक्रमात पोस्टरवर जरी सुप्रिया सुळे दिसल्या, तरी प्रत्यक्ष त्या स्टेजवर नव्हत्या, यामुळे देखील अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या.
Only Supriya’s poster with Pawar, Patel at the event in Delhi, Ajitdada on stage
महत्वाच्या बातम्या
- धुळ्यातील टिपू सुलतानच्या बेकायदेशीर स्मारकावर बुलडोझर, AIMIM आमदाराने उभारले होते, हिंदू संघटनांच्या तक्रारीनंतर कारवाई
- नवीन ‘’डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल’’ लवकरच संसदेत सादर केले जाणार – राजीव चंद्रशेखर
- WATCH : ‘गोडसेही भारताचे सुपुत्र, औरंगजेब आणि बाबरसारखे आक्रमक नव्हते’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे वक्तव्य
- क्रिकेट चाहत्यांचा फायदा, जियोनंतर आता हॉटस्टार मोफत दाखवणार ICC क्रिकेट वर्ल्डकप, OTT स्पर्धेचा परिणाम