• Download App
    Ajit Pawar अजितदादांचा राजकीय वारस एकटे पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??

    अजितदादांचा राजकीय वारस एकटे पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??

    नाशिक : अजितदादांचा राजकीय वारस एकटे शरद पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??, हा खरं तर “सवालच” नाही. खरं म्हणजे हे “उत्तर” आहे. कारण अजित पवारांचा राजकीय वारसा निवडणे हा एकट्या शरद पवारांचा किंवा सुप्रिया सुळेंचा घासच उरलेला नाही. तशी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात शिल्लकच राहिलेली नाही.

    – अजितदादा cementing force

    कारण अजित पवार ज्या पद्धतीचे राष्ट्रवादीतले अंतर्गत cementing force होते, म्हणजे अजित पवारांनी ज्या सत्तेच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष टिकवून धरला होता, तो आधार भाजपच्या सत्तेचा होता आणि आहे. आता अजित पवार हयात राहिले नसल्याने तो cementing force निघून गेलाय आणि अजित पवारांच्या ताकदीचा cementing force राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उरलेला नाही. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष टिकवून धरण्याची क्षमता सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यापैकी कुणाही कडे नाही. त्यामुळे अजित पवार ज्या तडफेने काम करून पक्ष टिकवून आणि उचलून धरत होते, तसे काम यापैकी कुणीही करण्याची शक्यता नाही.

    – अजितदादांसारखी “राजकीय किंमत” इतरांना नाही

    पण त्यापलीकडे जाऊन भाजपचे केंद्रीय नेते आणि राज्यस्तरावरचे नेते अजित पवारांना जी “राजकीय किंमत” देत होते, तेवढी “राजकीय किंमत” सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना भाजपचे नेते बिलकुल देणार नाहीत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस उभी करणे वाढविणे हा अजित पवारांचा अजेंडा होता. तोच अजेंडा पुढे नेण्याचा या सगळ्या नेत्यांचा इरादाही असेल, पण तो भाजपचा इरादा बिलकुल नाही. भाजपची ती जबाबदारी सुद्धा नाही. त्यामुळेच अजित पवार हयात असताना भाजपने निर्माण केलेली जी “राजकीय व्यवस्था” होती, ती “व्यवस्था” आता भाजप जशीच्या तशी पुढे चालविण्याची सुतराम शक्यता नाही. त्या राजकीय व्यवस्थेत भाजप अमुलाग्र बदल केल्याशिवाय राहणार नाही.



     पवारांनाच कार्यकर्त्यांचे ऐकावे लागेल

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर किंबहुना पक्षात फूट पाडूनच अजित पवार मूळ पक्षच भाजपा बरोबरच्या सत्तेशी संलग्न करून गेले. त्यामुळे इथून पुढच्या भविष्यात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्या, तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या सत्तेची वळचण पूर्णपणे सोडून पवारांचे मार्गदर्शन घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एक होऊ देणार नाहीत. थोडक्यात अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस हातात असलेली सत्ता सोडून विरोधी बाकांवर बसण्याची शक्यता नाही. त्या उलट शरद पवारांनाच त्यांची भाजप विरोधातली मूळ भूमिका सोडून भाजपशी जुळवून घेण्याची नवी भूमिका घ्यावी लागेल, तरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांचे मार्गदर्शन घ्यायला कबूल होतील. अन्यथा भाजपच्या राजकीय प्रेरणेतून अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडायला मोकळे राहतील.

    याचा अर्थ असा, की अजित पवारांचा राजकीय वारस निवडण्याची क्षमता एकट्या शरद पवारांकडे किंवा सुप्रिया सुळेंकडे उरलेलीच नाही. तिच्यात सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचा आयाम जोडला गेलाय आणि त्यात भाजपच्या नेत्यांचा म्हणजेच मोदी आणि शहांचा सिंहाचा वाटा आधीच तयार झाला आहे. त्याची नजीकच्या भविष्यात फक्त अंमलबजावणी होणार आहे.

    – सुनेत्रा पवारांचे नाव पुढे

    अजित पवारांच्या राजकीय वारसाची चर्चा नरहरी झिरवाळ यांनी लगेच सुरू करून दिली. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी त्यांनी केली. याचा अर्थच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवार यांचे नाव प्रमुख नेता म्हणून समोर आले. इथेच शरद पवारांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेत पुन्हा एकदा पाचर मारली गेली. कारण त्यांना सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे करायचे असताना झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांचे नाव पुढे आणून पाचर मारली. आता ही पाचर भाजपचे नेते स्वतःच्या हाताने काढणार??, की ती आणखी खोलवर मारणार??, या सवालाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. पण पाचर काढणे किंवा ती खोलवर मारणे हे फक्त भाजपच्या नेत्यांच्या हातात आहे.

    Only Pawar can choose Ajit Pawar political successor.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांना निरोप देताच राजकीय वारसाचा प्रश्न ऐरणीवर; सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांचे राजकीय भवितव्य आले विशिष्ट निर्णायक वळणावर!!

    आमच्या बारामतीकरांचा माज गेला; दादांच्या आठवणी सांगताना कार्यकर्त्याचे शब्द!!

    अजित पवारांच्या exit मुळे ZP निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल नाही; ठरलेल्या तारखेलाच निवडणुका!!