• Download App
    Hindi compulsion हिंदी सक्ती वरून आतापर्यंत फक्त एकाच कवीची पुरस्कार वापसी, पण मराठी माध्यमांनी दिली सगळे साहित्यिक एकवटल्याची बातमी!!

    हिंदी सक्ती वरून आतापर्यंत फक्त एकाच कवीची पुरस्कार वापसी, पण मराठी माध्यमांनी दिली सगळे साहित्यिक एकवटल्याची बातमी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मागे घेतला. त्याऐवजी सुधारित आदेश काढला तरी देखील महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषेची सक्ती विद्यार्थ्यांवर लादल्याचा आरोप करून मराठी कवी हेमंत दिवटे यांनी पुरस्कार वापसीची घोषणा केली. सचिन गोस्वामी, हेमंत ढोमे आदी कलाकारांनी हिंदी सक्ती विरोधात सोशल मीडिया पोस्ट लिहिल्या. पण त्यांनी पुरस्कार वापसी वगैरे काही केली नाही. तरीदेखील हिंदी सक्ती विरोधात मराठी साहित्यिक एकवटले आणि त्यांनी पुरस्कार वापसी सुरू केली, असा दावा करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. Hindi compulsion

    हिंदी सक्तीच्या विरोधातला विषय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लावून धरला त्यानंतर बाकीच्या राजकीय पक्षांना जाग आली सुप्रिया सुळे यांनी देखील मराठी हिंदी सक्तीला विरोध केला. राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे हिंदी सक्ती विरोधात उतरल्यानंतर मराठी कलावंत आणि साहित्यिकांना जाग आली. राज ठाकरे यांनी विरोध करेपर्यंत हे कलावंत आणि साहित्यिक जागे झाले नव्हते. पण राज ठाकरेंनी विरोध केल्याबरोबर अनेकांचे मराठी प्रेम जागे होण्याबरोबर हिंदी विरोध देखील जागा झाला. सचिन गोस्वामी, हेमंत ढोमे वगैरे कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून हिंदी सक्तीला विरोध केला.

    महाराष्ट्र शासनाने सुधारित आदेश काढल्यानंतरही तो विरोध कायम राहिला. मराठी अभ्यास केंद्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी वेगवेगळे तर्क लावून हिंदी सक्तीला विरोध केला. पण त्यापलीकडे जाऊन मराठीतले कवी हेमंत दिवटे यांनी शासनाचा पुरस्कार त्याच्या रकमेसह करत असल्याची घोषणा केली. बाकी कुणी अद्याप पुरस्कर वापसी केली नाही. तरीदेखील हिंदी सक्तीच्या विरोधात साहित्यिक एकवटले आणि पुरस्कार वापसी सुरू केली, असा दावा करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.

    Only one poet has returned an award so far due to Hindi compulsion.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय नाही, दारू दुकानांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका

    भाजप मधल्या टॅलेंटची सुप्रिया सुळेंना “चिंता”; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला का उपयोग होईना??

    Chandrashekhar Bawankule : भाजप खालच्या थराचे कृत्य करत नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळले प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणातील आरोप