प्रतिनिधी
मुंबई : गेल्या 37 वर्षांमध्ये मराठा आरक्षण न देणारे नेतेच मला टार्गेट करीत आहेत, अशा स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारनिष्ठ नेत्यांना टोला हाणला. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी मराठा आरक्षणावर सविस्तर भूमिका मांडली. Only leaders who do not give Maratha reservation target me
1980 पासून ते आत्तापर्यंत जे नेते मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत किंवा त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले नाहीत, असेच नेते मला केवळ जातीच्या मुद्द्यावर टार्गेट करत आहेत. पण प्रत्यक्षात मराठा आरक्षणासाठी शासकीय पातळीवर आणि हायकोर्टापर्यंत नेमके कोणी खरे काम केले?, सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्यामार्फत मराठा तरुणांना आणि विद्यार्थ्यांना कशा सवलती दिल्या याची महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्ण माहिती आहे, असे उद्गार फडणवीस यांनी काढले.
आपण मुख्यमंत्री असताना दिलेले मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले. सुप्रीम कोर्टात सहा महिन्यांपर्यंत व्यवस्थित युक्तिवाद सुरू राहिले पण आपले सरकार गेल्यानंतर सुप्रीम कोर्टातले सरकारी युक्तिवाद सैलावत गेले, हे मराठा समाजाने पाहिले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पदावर शिंदेच कायम
महाराष्ट्रामध्ये आमची महायुती सत्तेवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे कोणाच्या मनामध्ये शंका घेण्याचे कारण नाही. अशा प्रकारचा जो व्हिडिओ आला तो भाजपच्या ऑफिशियल ट्विटर हँडल आहे. पण सत्ताबदल करायचा असेल तर ट्विटर हँडलवर करून येईल का? पण, जाणीवपूर्वक काही लोकांनी याचा खेळ करण्याचा प्रयत्न केला. असे विषय ज्या विषयांमध्ये काहीच नाही असे विषय चालू द्यावे आणि म्हणून हा सारा खेळ सुरु आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यात महायुती सत्तेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांची पूर्ण टर्म ते पूर्ण करतील. एकही दिवस आधी नाही. पूर्ण टर्म पूर्ण करतील. त्यांच्याच नेतृत्वात ही महायुती ते मुख्यमंत्री असतानाच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि आम्ही निवडणूक जिंकू. त्यामुळे कुणाच्या मनात शंका घेण्याचं कारणच नाही. म्हणून अशा प्रकारच्या व्हिडिओचा वेगळा अर्थ काढला गेला. मला तर याबाबत माहीतच नव्हतं. मला कुणी तरी येऊन सांगितलं. मी म्हटलं डिलीट करा असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे परिपक्व आहेत. राजकीय परिस्थिती आहे. आमचा संवाद चांगला आहे. अशा एका व्हिडीओमुळे ते डिस्टर्ब होतील आणि फोन करतील एवढे अपरिपक्व ते नाहीत. काही लोकांनी जाणीवपूर्वक हा खेळ करण्याचा प्रयत्न केला. ज्या विषयात काहीच नाही ते विषय चालू द्यावेत अशी राजकीय परिस्थिती नाही. हा कुणाला इशारा वैगरे देण्याचा प्रश्न नाही. अशी काही परिस्थिती असेल असे मला वाटत नाही. सरकारमध्ये 1OO टक्के समन्वय आहे. सरकारमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्रित सरकार चालवतात त्यावेळी अडचणी असतात. पण, आज तरी अशी परिस्थिती नाही. अजितदादा आमच्यासोबत आले आहेत आणि एकत्रित राहतील.
अजित दादा शिंदे यांना इशारा आहे का?
कुणाला इशारा द्यायचा असेल तर तो व्हिडिओच्या माध्यमातून दिला जात नाही. इशारा देण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. पण असा इशारा देण्याची गरजच काय आहे. सरकार चांगलं चाललं आहे. आम्ही सरकारमधील सर्व समाधानी आहोत. आमच्यापुढे सरकार म्हणून आव्हानं खूप आहेत. त्या आव्हानांचा आम्ही सामना करत आहोत. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत कुणाला इशारा देण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणी सोबत याला तयार असेल तर…
तीन पक्षांचे सरकार आहे. मतमतांतरे असतात. पण. त्यामुळे आमच्यात भांडणं होतील अशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादी आणि त्यानंतर काही घटना घडल्या. त्याचवेळी अजितदादा यांना सांगितलं होतं की मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हेच राहतील. अजितदादा आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत 2019 ला येणार होते. त्यानंतरही राष्ट्रवादीमध्ये ही चर्चा होती की भाजप सोबत गेलं पाहिजे. स्थिर सरकार आणि काम करणारे सरकार हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होऊ शकत नाही. ते भाजपसोबतच होऊ शकते ही त्यांची मानसिकता होती. त्यांचे ठाम मत होते. त्यांनी येण्याचा प्रस्ताव दिला आम्हाला तो योग्य वाटला. तुमची शक्ती वाढवण्याकरता जर कोणी सोबत याला तयार असेल तर त्याला का घेऊ नये, असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Only leaders who do not give Maratha reservation target me
महत्वाच्या बातम्या
- परत येणारा तर व्हिडिओ टाकून येतो का??; देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांनाच टोला!!
- US : लुईस्टनमध्ये २२ जणांची हत्या करणाऱ्या संशयिताचा सापडला मृतदेह, पोलिसांना आत्महत्येचा संशय
- ‘गीता प्रेस’चे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल यांचे निधन; मुख्यमंत्री योगी यांनी व्यक्त केला शोक
- दिल्लीत नागरी संरक्षण स्वयंसेवकांना काढून टाकण्याचा प्रस्ताव मंजूर; सरकारने स्वतः एलजीकडे पाठवली होती फाइल, आता केजरीवाल सुप्रीम कोर्टात