वृत्तसंस्था
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनविरोधी लसीकरण मोहीम संथ सुरु आहे. कारण वर्षाअखेर ३६ पैकी ४ जिल्ह्यातच १०० टक्के लसीकरण होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या पुणे आणि मुंबई या जिल्ह्यानी १०० पेक्षा जास्त टक्के लसीकरण केले. त्या पाठोपाठ भंडारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर आहे. Only 4 Maharashtra districts may reach 100% first-dose target by year-end
राज्यात ८६ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस हा देण्यात आला आहे. पण, २२ जिल्ह्यात याची सरासरी त्याहूनही कमी आहे. दुसरीकडे लसीकरणात मुंबई आणि पुण्याने आघाडी घेतली आहे. त्यात मुंबई १०६ टक्के तर पुणे १०३ टक्के एवढे लसीकरण करून आघाडीवर आहे.
१०० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण करण्याचा मान या जिल्ह्याने पटकाविला आहे. त्या पाठोपाठ भांडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा नंबर लागतो. त्यांनी ९६ टक्के लसीकरण केले आहे. भंडाऱ्याला ३७ हजार तर सिंधुदुर्गला २६ हजार डोस १०० टक्के टार्गेट पूर्ण करण्यासाठी राहिले आहे. येत्या काही दिवसात ते हे टार्गेट पूर्ण करतील, अशी आशा निर्माण झाली आहे. जानेवारीपासून आजअखेर १२ कोटी ७७ लाख डोस दिले गेले असून ७.८७ कोटी पहिले तर ४.८९ कोटी दुसरे डोस आहेत.