विशेष प्रतिनिधी
मुंबई: मोबाईल, टॅब किंवा टीव्हीवर ऑनलाईन गेम्स खेळणं ही अनेकांची सवय झाली आहे. ही सवय आता व्यसनामध्ये परावर्तीत होऊ लागली आहे. त्यामुळे या गेमिंगवर नियंत्रण आणण्याची मागणी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देखील करण्यात आली आहे .
ONLINE GAME: Youngsters addicted to online gaming! BJP MP Sushil Modi demands ban on online gaming
केवळ टाईमपास असलेली ऑनलाईन गेमिंग सवय कधी झालं आणि त्यानंतर व्यसन कधी झालं हे आपल्यालाही समजलं नाही. मात्र आता आपल्या देशात ऑनलाईन गेमिंगची ‘साथ’ आली आहे की काय अशी शंका उपस्थित झाली आहे.
राज्यसभेत भाजप खासदार सुशील मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. 24 तास तहान, भूक, झोप विसरून गेम खेळणारी तरूण पिढी तयार होत आहे. काही ऑनलाईन गेम्समध्ये पैसे कमावण्याची संधी असल्यामुळे जुगाराप्रमाणे त्याचं व्यसन लागत आहे. ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रणासाठी कायदा आणण्याची गरज व्यक्त होत आहे. काही जणांनी तर सरसकट बंदीची मागणीही केलीये. मात्र अशी बंदी घालणं शक्य आहे का, याचा विचार सरकारला करावा लागणार आहे. ऑनलाईन गेमिंगमधील उलाढाल प्रचंड आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगला कायद्याच्या चौकटीत बसवून त्यावर नियंत्रण ठेवणं मात्र गरजेचं आहे. पालकांनीही आपली मुलं यात किती वेळ वाया घालवतायत, याकडे लक्ष दिलं पाहिजे.
ONLINE GAME: Youngsters addicted to online gaming! BJP MP Sushil Modi demands ban on online gaming
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बाब ; झांबिया देशातून आलेला ‘ तो ‘ व्यक्ती ओमायक्रॉन निगेटिव्ह
- चंद्रपूर : अचानक दुचाकीपुढे आला बिबट्या , भीषण अपघात ; सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
- ओमायक्रॉन या नवा व्हेरिएंटची भीती ;जमावबंदीसारखे निर्बंध लावणारा अकोला हा पहिलाच जिल्हा
- राजकारण हे भौतिकशास्त्र नाही, ते रसायनशास्त्र, युतीच्या मतांची बेरीज-वजाबाकी होत नाही, अमित शहा यांचा दावा