वृत्तसंस्था
कोल्हापूर : कोरोना रूग्णसंख्येमध्ये घट झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देवदर्शनासाठी ऑनलाईन ई पास ची अट शिथिल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची करवीरनिवासिनी महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरामध्ये आता दर्शनासाठी ई पासची गरज नाही. Online at Mahalakshmi and Jyotiba temples E pass condition relaxed; Great relief to the devotees
दरम्यान भाविकांची होणारी गैरसोय आणि काही तक्रारी येत असल्याने ही ई पासची अट हटवण्यात आल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या मंदिरात ७ ऑक्टोबर २०२१ दिवशी ई पास दर्शन पद्धती सुरू करण्यात आली होती.
Online at Mahalakshmi and Jyotiba temples E pass condition relaxed; Great relief to the devotees
महत्त्वाच्या बातम्या
- पत्नीने खोटी तक्रार दाखल करणे पतीचा छळच, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा
- ग्वाल्हेरच्या महाराजांनी हातात घेतला झाडू, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कृतिने घडविला इतिहास
- JALNA : काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची भाजपमध्ये एन्ट्री ! विकासासाठी मी नेहमीच कमळासोबतगोरंट्याल – त्यावर भागवत कराड म्हणतात जालण्याचा विकास करण्यासाठी कायमचं या आमच्यासोबत …
- चित्रपटांमध्ये पोलीसांची प्रतिमा चुकीच्या पध्दतीने दाखविणे देशाचे दुर्दैव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खंत