• Download App
    आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू, आंदोलनात केले होते विष प्राशन । One more ST worker died in the agitation

    आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू, आंदोलनात केले होते विष प्राशन

    एसटी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात मृत्युमखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 40हून अधिक झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. One more ST worker died in the agitation


    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : एसटी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात मृत्युमखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 40हून अधिक झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. खामगाव येथे विष प्राशन केलेल्या विशाल अंबलकर यांचा गुरूवारी रात्री अखेर मृत्यू झाला. विष प्राशन केल्यानंतर त्यांना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.



    राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, याप्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगारांनी १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. या संपादरम्यान, विविध एसटी आगारासमोर परिवारासह आंदोलन केले जात आहे. संपकरी कामगारांना महामंडळाकडून निलंबित केले जात आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्यांनी धास्ती घेतली आहे. खामगाव येथील सहा. मॅकेनिक या पदावरील यांत्रिक कर्मचारी विशाल अंबळकर(२९) रा. माटरगाव ता. शेगाव यांनी बुधवारी रात्री १० वाजता विषारी औषध प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्यांना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यामुळे गुरूवारी रात्री त्यांना तात्काळ अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान अंबळकर यांचा मृत्यू झाला.

    One more ST worker died in the agitation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!