• Download App
    एका तिळाचे शंभर तुकडे पुसदच्या अभिषेक रुद्रवारची इंडिया बुकमध्ये एन्ट्री|One hundred pieces Of a one sesame

    WATCH : एका तिळाचे शंभर तुकडे पुसदच्या अभिषेक रुद्रवारची इंडिया बुकमध्ये एन्ट्री

    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ – ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा’ असा एक वाक्प्रचार आहे.अर्थ सरळ आहे. सर्वांनी वाटेकरी झाल्यास समाधान लाभते. परंतु तीळ तर लहान असतो.तो कसा वाटून खावा हा प्रश्न कुणालाही पडतो.खाण्याचे जाऊ द्या,One hundred pieces Of a one sesame

    परंतु पुसद येथील अभिषेक सूर्यकांत रुद्रवार या मनस्वी कलावंताने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने १६ मिनिटे २० सेकंदात चक्क शंभर तुकडे केले आणि त्यांना क्रमांकही दिले.त्याच्या या अभिनव कृतीची दखल घेत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली.



    संस्थेतर्फे त्याचा पदक, प्रशस्तीपत्र, ओळखपत्र व पेन देऊन या गौरव करण्यात आला. पुसद शहरातील विटावा वॉर्डातील अभिषेक सध्या नांदेड येथील एमजीएम कॉलेज मध्ये बीएफए अंतिम वर्षाला शिकत आहे. मुळात तो कलावंत आहे. मायक्रो आर्ट हा त्याच्या आवडीचा विषय आहे.त्याने आतापर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, माचीसची काडी यावर गणपतीचे चित्र रेखाटले आहे.

    तिळावर चक्क त्याने ए,बी,सी,डी यासारखे इंग्रजी मुळाक्षरे तर १ ते १० पर्यंतचे अंक लिहिले आहेत. तसेच पेन्सिलच्या टोकावर त्याच्या सूक्ष्म कलेतून माहूरची रेणुका, कोल्हापूरची देवी साकारली. त्याच्या कलेचे अनेक कंगोरे आहेत. वाळलेल्या पानांवर कटिंग करून बुद्ध, शिवराय यासारख्या महापुरुषांचे चेहरे साकार करणे,

    एक रूपयाच्या नाण्यावर विविधरंगी निसर्ग चित्र रेखाटणे,आपट्याच्या पानावर सुरेख निसर्गरंग भरणे असा कलात्मक छंद अभिषेकने जोपासला आहे. याशिवाय जुन्या नाण्यांचा मोठा संग्रह अभिषेककडे आहे. तांदळाच्या दाण्यावर तो सहजतेने झेंडा रेखाटतो. संक्रांतीला पतंग तांदूळ दाण्यावर काढतो.

    विशेष म्हणजे अक्षरांमधून गणपतीचे रूप तो सहजतेने साकारतो.त्याने तयार केलेली अक्षर गणपतीची रूपे अक्षरशः मनाला भुरळ पाडतात.इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर आता त्याला गिनीज बुक मध्ये विक्रमाची नोंद करावयाची आहे.त्या दृष्टीने त्याची तयारी सुरू आहे.

    • एका तिळाचे शंभर तुकडे करण्याचा विक्रम
    •  १६ मिनिटे २० सेकंदात चक्क शंभर तुकडे
    • प्रत्येक तुकड्याला क्रमांक सुद्धा दिले
    •  पुसदच्या अभिषेक रुद्रवारची किमया
    •  इंडिया बुकमध्ये एन्ट्री
    • मायक्रो आर्टमध्ये पारंगत

    One hundred pieces Of a one sesame

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा