• Download App
    पुन्हा एकदा संजय राठोडांच्या अडचणीत वाढ , शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार। Once again, a woman lodged a complaint with the police regarding Sanjay Rathore's increase in difficulty and demand for physical comfort

    पुन्हा एकदा संजय राठोडांच्या अडचणीत वाढ , शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार

    यवतमाळ पोलिसांकडे याबाबत पोस्टाने ही तक्रार करण्यात आली आहे. महिलेने लिखित तक्रारीत नमूद केले  आहे की संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. Once again, a woman lodged a complaint with the police regarding Sanjay Rathore’s increase in difficulty and demand for physical comfort


    विशेष प्रतिनिधी

    यवतमाळ / मुंबई : एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात शिवसेना नेते यांनी मंत्रिपद गमावले होते.मंत्रिपद गमावलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली आहे.

    यवतमाळ पोलिसांकडे याबाबत पोस्टाने ही तक्रार करण्यात आली आहे. महिलेने लिखित तक्रारीत नमूद केले  आहे की संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे.

    त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो, असं त्यात म्हटले आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले आहे.



    नक्की काय आहे जुन प्रकरण?

    संबंधित तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी वातावरण पेटवल्यानंतर  राठोड काही काळ शांत राहिले होते.

    काही दिवसांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत घेत राठोड यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता, मात्र विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. 28 फेब्रुवारीला मुंबईला येऊन त्यांनी राजीनामा दिला होता.

    आता राठोड पुन्हा मंत्रिमंडळात परतणार?

    तरुणीच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे राठोड यांनी तिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची भूमिका घेत राजीनामा दिला होता. मात्र आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    Once again, a woman lodged a complaint with the police regarding Sanjay Rathore’s increase in difficulty and demand for physical comfort

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ