वृत्तसंस्था
मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला पण पंतप्रधान इंदिरा गांधींनी तर सावरकरांचीच धोरणे अंमलात आणली. त्यांनी पाकिस्तान तोडून दाखवला, अशा शब्दांमध्ये सावरकरांचे पणतू आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींचे पुन्हा एकदा वाभाडे काढले.
सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींची कानउघाडणी केली. इंदिरा गांधींनी सावरकरांना देशाचे वीर सुपुत्र म्हटले होते याची आठवण करून दिली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी अपमानास्पद उद्गार काढू नयेत अन्यथा कारवाई करू, अशी तंबी दिली. या मुद्द्यावरून रणजीत सावरकर यांनी देखील राहुल गांधींची खेचली. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर तरी राहुल गांधी सुधारतील आणि ते सुधारले नाहीत, तर आम्ही खटले पुढे चालवून त्यांना जेलमध्ये घालू, असा इशारा रणजीत सावरकर यांनी दिला.
रणजीत सावरकर म्हणाले :
- राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्या विरोधात देशातल्या वेगवेगळ्या कोर्टांमध्ये खटले सुरू आहेत. पण सुप्रीम कोर्टाने त्यांचे कान खेचले हे बरे झाले. सुप्रीम कोर्टाने इंदिरा गांधींचा हवाला दिला. इंदिरा गांधींनी सावरकरांचा नेहमीच सन्मान केला. त्यांनी सावरकरांची धोरणे अंमलात आणली.
- सावरकरांना देशात औद्योगिकीकरण हवे होते, ते इंदिरा गांधींनी केले. भारताने अणुबॉम्ब बनवावा असे सावरकरांचे मत होते, ते इंदिरा गांधींनी अंमलात आणले. इंदिरा गांधी नाव गांधीजींचे घ्यायच्या, पण धोरणे सावरकरांची अंमलात आणायच्या.
- मोहम्मद अली जीनांनी घोषणा दिली होती, हसके लिया पाकिस्तान, जीत कर लेंगे हिंदुस्तान, त्याला सावरकरांनी प्रत्युत्तर दिले होते, एक धक्का और दो, पाकिस्तान तोड दो!! सावरकरांची ही घोषणा इंदिरा गांधींनी अंमलात आणली. त्यांनी पाकिस्तान तोडून टाकला. बांगलादेशाची निर्मिती केली.
On the Supreme Court pulling up Lok Sabha LoP Rahul Gandhi on the Savarkar remark, Ranjit Savarkar
महत्वाच्या बातम्या
- दहशतवाद्यांचा निषेध करत बीएसएफचा मोठा निर्णय; अटारी, हुसेनिवाला आणि सद्की येथील ‘रेट्रीट सेरेमनी’तील हस्तांदोलन बंद
- Pakistan शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!
- IMF : IMF ने भारताच्या GDP वाढीचा अंदाज 0.30% ने घटवला; आर्थिक वर्ष 2025-26साठी 6.2%