विशेष प्रतिनिधी
नाशिक / कळवण : कळवण तालुक्यातील जामशेत या ग्रामीण भागातील महिलांनी राज्यात पाऊस पडावा, यासाठी सप्तशृंगी देवीला साकडे घातले आहेत. On the Saptashrungi fort, women go to the goddess for rain
कळवण तालुक्यातील जामशेत या ५० किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागातून २० ते २५ महिलांनी डोक्यावर पाण्याचा हांडा घेऊन अर्धे शक्तीपीठ सप्तशृंगी गडावर येऊन देवीला साकडे घातले आहेत. सध्या शेतीसाठी पाणी नाही,कोरोनाचे संकट तसेच दुष्काळ नाहीसा व्हावा ,यासाठी सप्तशृंगी देवीला साकडे घालून देवीला मागणी केली.
- सप्तशृंगी देवीला पावसासाठी साकडे
- डोक्यावर हांडे घेऊन महिला गडावर
- कोरोना नाहीसा व्हावा, अशीही मागणी
- आस्मानी संकट नाहीसे करण्याचा आग्रह
- शेतकऱ्यांना दिलासा मिळावा