विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे काँग्रेसची जाहीरनाम्यातून न्यायाची भाषा, तर दुसरीकडे एका खासदाराच्या मृत्यूची कामना, अशी विसंगती समोर आली आहे. काँग्रेसने राजधानी नवी दिल्लीत जाहीरनामा प्रकाशित करून ते जनतेचे न्याय पत्र असल्याचे घोषित करून टाकले जनतेला वेगवेगळ्या प्रकारचे न्याय देऊन जनतेला सुखी करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले. पण एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे त्यांचेच प्रदेशाध्यक्ष नाना पटेल हे मात्र एका खासदाराच्या मृत्यूची कामना करून त्याची खिल्ली उडवत होते On the one hand, the language of “justice” from the Congress manifesto, on the other, Nana wished the MP “death”!!; Fadnavis attack!!
अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे हे व्हेंटिलेटर वर आहेत. त्यांचा व्हेंटिलेटर कधी काढतील हे माहिती नाही. कदाचित या निवडणुकीतच व्हेंटिलेटर काढून टाकतील, अशा स्तर घसरलेल्या भाषेत नाना पटोले जाहीर सभेत बोलले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या याच विसंगतीवर बोट ठेवले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट करून काँग्रेसचे पुरते वाभाडे काढले. नानांच्या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला.
फडणवीस यांनी लिहिले :
काँग्रेस पक्ष एकिकडे दिल्लीत “न्यायपत्र” जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या “मृत्यूची कामना” करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो, तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तत्काळ माफी मागा ! खा. संजय धोत्रे जी यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
On the one hand, the language of “justice” from the Congress manifesto, on the other, Nana wished the MP “death”!!; Fadnavis attack!!
महत्वाच्या बातम्या
- आपने नव्या वादाला फोडले तोंड, भगतसिंग-आंबेडकरांसोबत केजरीवालांचा फोटो, भाजपने घेतला आक्षेप
- मिशन 400 च्या नाहीत नुसत्याच गप्पा; भाजपने वाढविला तरी कसा मुस्लिम मतांचा टक्का??; वाचा सविस्तर!!
- लडाखमध्ये ‘इमर्जन्सी लँडिंग’ दरम्यान IAFच्या अपाचे हेलिकॉप्टरला अपघात
- लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निकाल राखून ठेवला