• Download App
    एकीकडे जयंत पाटलांचा शिंदे सरकार कोसळण्याचा "मुहूर्त"; दुसरीकडे चंद्रकांत खैरेंचा 22 काँग्रेस आमदार फुटण्याचा इशारा On the one hand, Jayant Patal's mohurt of the fall of the Shinde government

    एकीकडे जयंत पाटलांचा शिंदे सरकार कोसळण्याचा “मुहूर्त”; दुसरीकडे चंद्रकांत खैरेंचा 22 काँग्रेस आमदार फुटण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याचा राजकीय मुहूर्त जाहीर केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हे सरकार कोसळू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 काँग्रेस आमदार फोडण्याचे नियोजन केल्याचा इशारा दिला आहे. यातून एक प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच शिंदे फडणवीस सरकार कोसळणार की टिकणार या विषयावर एकमत नसल्याचे दिसून येत आहे. On the one hand, Jayant Patal’s “mohurt” of the fall of the Shinde government

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी मध्ये चिंतन शिबिर सुरू आहे हे चिंतन शिबिर झाले की शिंदे – फडणवीस सरकार कोसळेल आणि महाविकास आघाडी सरकार येईल, असे राजकीय भाकीत जयंत पाटील यांनी केले आहे. त्याला राष्ट्रवादीच्या बाकीच्या नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र, त्यापूर्वी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे 12 मोठे नेते फुटणार असल्याचे राजकीय भाकीत करून ठेवले होते. या भाकितावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिवाद करताना शिंदे – फडणवीस सरकार धोक्यात असल्याचा दावा केला होता.

    मात्र या दाव्यालाच चंद्रकांत खैरे यांनी आपल्या विधानातून सुरू लावला आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवले की शिंदे – फडणवीस सरकार कोसळेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय हुशारीने काँग्रेसचे 22 आमदार फोडण्याची तयारी ठेवली आहे, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. काँग्रेसचे 22 आमदार फुटले आणि त्यांनी सरकारला पाठिंबा दिला की हे सरकार कोसळणार नाही, असा फडणवीसांचा राजकीय होरा असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

    पण एकूण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी कोणत्याही पक्षाच्या फुटीवर काहीही भाष्य केलेले नाही. त्या उलट महाविकास आघाडीतले राष्ट्रवादीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे नेतेच एकमेकांचे पक्ष फुटणार असल्यावर भाष्य करत आहेत. यातून महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसते आहे.

    On the one hand, Jayant Patal’s mohurt of the fall of the Shinde government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!