विशेष प्रतिनिधी
मुंबई : चॉकलेटचा बांगला तुम्ही गाण्यात ऐकला असेल. पण, चॉकलेटचे बॉम्ब ऐकून धक्का बसला ना ? पण हे खरे आहे. सारिका शाहू यांनी दिवाळीच्या निमित्ताने चक्क चॉकलेटचे बॉम्ब बनविले आहेत. On the occasion of Diwali Chocolate bomb
त्यांनी दिवाळीत सोडले जाणारे क्रेकर्स म्हणजेच फटाके पाऊस, लक्ष्मी बॉम्ब, दगडी बॉम्ब अनेक प्रकारचे असे बॉम्ब तयार केले आहेत. मात्र हे बॉम्ब चॉकलेटचे आहेत. त्यासाठी बनवायला त्यांना पंचवीस ते तीस मिनिटे लागतात. मात्र ते बॉम्ब दिसतात पण ते चॉकलेटचे आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून दिवाळीच्या निमित्त हे असे बॉम्ब बनवतात त्यांना बाहेर गावावरून सुद्धा ऑर्डर्स येतात लहान मुलांकडून जास्त मुंबईमध्ये त्यांची विक्री होते लोक आवडीने त्यांच्याकडून हे बॉम्ब चॉकलेटचे खरेदी करतात.
सारिका शाहू या बेकर आहेत त्यांनी यासाठी एक महत्त्वाचा कोर्स केलेला आहे मात्र दिवाळी येत असताना नवीन काय करायचं तर त्यांनी जे आपण दिवाळीत सोडले जाणारे क्रेकर्स बॉम्ब असतात त्याच मध्ये त्यांनी ते हुबेहूब दिसणारे चॉकलेट्स तयार केले आहेत. त्यांची खूप मेहनत आहे. येत्या वर्षातही ते असेच उपक्रम राबवणार आहेत आणि असेच चॉकलेट्स वगैरे बनवण्यात त्यांचा प्रयत्न असेल.
- दिवाळीच्या निमित्त चॉकलेटचे बॉम्ब
- फटाके पाऊस, लक्ष्मी बॉम्ब, दगडी बॉम्ब चॉकलेटचे
- बाहेर गावावरून सुद्धा ऑर्डर्स येतात
- लहान मुलांकडून जास्त मागणी ,मुंबईमध्ये विक्री
- क्रेकर्स बॉम्ब प्रमाणे दिसत असल्याने लोकप्रिय