विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातल्या फडणवीस सरकारने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभेत पाठिंबा दिला. तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनीच फक्त जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात अधिकृत मत नोंदविले. बाकी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी त्या विधेयका संदर्भात सूचना जरूर केल्या. परंतु निर्णयाक फडणवीस सरकारने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाला पाठिंबा दिला. विधानसभेने हे जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर केले. Maharashtra Special Public Security Bill
पण विधानसभेच्या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते विधेयक विधान परिषदेत येताच जाग आली. फडणवीस सरकारने मांडलेले जनसुरक्षा विधेयक हे भाजप बचाव विधेयक असल्याची टीका केली. त्यांनी या विधेयकाला शिवसेनेचा विरोध असल्याचे जाहीर केले. सरकार बोलतोय एक आणि करतेय दुसरंच. सरकारचा पॉलिटिकल अजेंडा वेगळा आहे. डावी विचारसरणी ठोकून काढायचा आणि विरोधकांना तुरुंगात घालायचा सरकारचा डाव आहे. पण मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास ही खरी डावी विचारसरणी आहे. पण फडणवीस सरकारला जनसुरक्षा कायद्याचा बडगा चालवून सर्वसामान्य नागरिकांना दाखवून तुरुंगात कोंडायचे आहे. त्यामुळे आमचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध आहे, असे उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळ परिसरात जाहीर केले.
उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये किती गोंधळ आहे हेच समोर आले. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जसा विधानसभेत संबंधित विधेयकाला पाठिंबा दिला तसाच पाठिंबा काँग्रेसचे आमदारांनी दिला. पण काँग्रेसचे केंद्रीय नेते त्यामुळे नाराज झाले. फडणवीस सरकारने मांडलेल्या जन सुरक्षा विधेयकाला काँग्रेसच्या 16 आमदारांनी तीव्र विरोध करायला हवा होता विधानसभेत आणि विधानसभे बाहेर त्यांनी मोठा आवाज उठवायला हवा होता असे मत केंद्रीय नेत्यांनी व्यक्त केले. पण यातून काँग्रेसमधल्या समन्वयाचा अभावच समोर आला. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या आजच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतली राजकीय विसंगती देखील समोर आली.
On the Maharashtra Special Public Security Bill, Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Taliban : तालिबान नेत्यांविरुद्ध इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाचे अटक वॉरंट; महिलांवरील अत्याचाराचे आरोप
- Trump : युक्रेनला शस्त्र पुरवठा रोखल्याने ट्रम्प नाराज; पेंटागॉनने याबद्दल राष्ट्राध्यक्षांना माहिती दिली नाही
- Tahawwur Rana, : दहशतवादी तहव्वूरची न्यायालयीन कोठडी 13 ऑगस्टपर्यंत वाढली; NIAने पुरवणी आरोपपत्र दाखल केले
- Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- संसदेला सूचना देऊ शकत नाही, कायदे बनवणे-बदलणे त्यांचे काम; BNSची कलमे हटवण्याची याचिका फेटाळली