नातेवाईक शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा तोडून आत गेले.त्यांनी पाहिलं तर सचिन शिवराज अंबुलगे यांनी साडीच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. On the group by a teacher from Latur A heartfelt tribute to his own photo
विशेष प्रतिनिधी
लातूर : जिल्हा परीषद शाळेतील एका सहशिक्षकाने व्हाॅट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो टाकून भावपूर्ण श्रध्दांजली अशी पोस्ट टाकून आत्महत्या केल्याची घटना काल जिल्ह्यातील चाकूर येथे घडली आहे.चाकूर येथील जिल्हा परीषद मुलांच्या शाळेत सचिन शिवराज अंबुलगे (40) हे शिक्षक म्हणून कार्यरत होते.दरम्यान शहरातील आदर्श काॅलनीतील एका भाड्याच्या खोलीमध्ये ते कुटुंबीयासह राहत होते.
सचिन शिवराज अंबुलगे यांची पत्नी व मुलगा गावाकडे गेले होते. दरम्यान रात्री अंबुलगे यांनी शाळेतील शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो टाकून भावपुर्ण श्रध्दांजली असे लिहले.तसेच त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत नातेवाईकांनाही सांगितले होते. दरम्यान नातेवाईक
शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा तोडून आत गेले.त्यांनी पाहिलं तर सचिन शिवराज अंबुलगे यांनी साडीच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शिवाजी गुंडरे, बालाजी नाईक यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.अंबुलगे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तसेच अंबुलगे यांच्या पत्नीने खाजगी सावकार पतीला त्रास देत असल्याची तक्रार काही दिवसापुर्वी पोलीसांत दिली होती.याबाबत भाऊ रविंद्र अंबुलगे यांच्या तक्रारीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
On the group by a teacher from Latur A heartfelt tribute to his own photo
महत्त्वाच्या बातम्या
- इंदापूर : माणुसकीला काळीमा फासणारी घटना, आई – वडील ८ दिवसांच्या नवजात बालकाला कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर सोडून पसार
- पुरोहितांनी ई श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी करावी; अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन
- “2 फेब्रुवारीपर्यंत लोककलावंतांना तमाशा सादर करण्यासाठी परवानगी द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करू” – रघुवीर खेडकर
- अहमदनगर आगारातील एसटीच्या 130 कामगारांवर कारवाई होणार, अजूनही संप सुरूच
- “अमोल कोल्हे वैचारिकदृष्ट्या गद्दार निघाले,आम्ही कोल्हे यांना माफ करणार नाही” – संभाजी ब्रिगेड