प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभर प्रचंड जल्लोषात साजरी होत असताना मुंबईतील इस्राईलचे राजदूत कोबी शोशनी यांनी शिवाजी महाराजांना मराठमोळी मानवंदना दिली आहे. इस्राईलच्या दुतावासाने एक ट्विट करत शिवजयंतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये राज्यातील शिवजयंती सोहळ्याचा व्हिडीओ ट्विट करत या व्हिडीओच्या माध्यमातून इस्राईलच्या राजदुतांनी शुभेच्छा दिल्या आहेत. On the birthday of Chhatrapati Shivaji Maharaj here is a small surprise from the Israeli Diplomats in Mumbai
राज्यात आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा,आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच शिवनेरीवर शिवजयंती साजरी केली.
त्याचबरोबर दिल्लीच्या लाल किल्ल्यात औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजेंना कैद केले होते त्या आग्र्याच्या किल्ल्यात आज इतिहासात पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून १० हजार शिवभक्त दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव किल्ल्यात केवळ ४०० शिवभक्तांना प्रवेश मिळणार आहे.
शिवजयंती निमित्त लाल किल्ल्यावर शिवरायांच्या शौर्यावर आधारित नाटक आणि विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशनच्या वतीने लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार आहेत.
On the birthday of Chhatrapati Shivaji Maharaj here is a small surprise from the Israeli Diplomats in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- महाकालाच्या उज्जैनमध्ये 21 लाख दिव्यांनी उजळला क्षिप्रा घाट
- हा शिवसेना, राष्ट्रवादी अथवा काँग्रेसच्या फोडाफोडीचा मुद्दा नाही, तर भाजपच्या नव्या राजकीय व्युहरचनेचा मुद्दा आहे!!
- बिहारमधल्या 45 आमदारांचे नेते नितीश कुमारांची भाजपला लोकसभा निवडणुकीत 100 जागांमध्ये गुंडाळण्याची महत्त्वाकांक्षा!!
- सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने झटकले हात; पण मनमोहन सिंगांची मुलगी अमृत, शिवशंकर मेनन, हर्ष मंदर ते सलील शेट्टी सर्वांची सोरोसला साथ!!