• Download App
    gas shortage एकीकडे गॅस टंचाईची होरपळ; दुसरीकडे राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता!!

    एकीकडे गॅस टंचाईची होरपळ; दुसरीकडे राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एकीकडे गॅस टंचाईची होरपळ आणि दुसरीकडे राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता अशा कात्रीत सामान्य जनता अडकली आहे. राज्यातले फडणवीस सरकार गॅस टंचाई संदर्भात तोडगा काढायचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी नवीन नियमावली सुद्धा लागू केली आहे परंतु आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि इराण युद्ध यामुळे गॅस टंचाईवर तोडगा काढायला मर्यादा पडल्या आहेत.

    या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.



    रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

    On one hand, the ordeal of a gas shortage; on the other, the possibility of stormy rains and hailstorms across the state for four days.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महा-साधना सप्ताह 2026 : भविष्याभिमुख सुशासनासाठी सक्षम प्रशासनिक तंत्र; 8.8 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी सहभागी

    Maharashtra IAS Reshuffle : महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल:24 हून अधिक IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    Maharashtra Revenue : महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय