विशेष प्रतिनिधी
मुंबई : जे सरकार १७० चे बहुमत असल्याचे सांगत आहे. त्या सरकारच्या मनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी स्वत:च्या बहुमतावर विश्वास का नाही का? , स्वतःच्या आमदारांवर एवढा अविश्वास का ? असा प्रश्न भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.On its own legislators Why such disbelief?
ते म्हणाले, नियम बदलविले तर किमान त्याचा सभागृहासमोरील विचाराचा कालावधी कमी करता येणार नाही.महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही.
स्वतःच्या आमदारांवरच अविश्वास असणारे सरकार आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिले नाही.महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून जी प्रथा होती, ती बदलण्याचा अट्टाहास का ? तुम्ही हे रेटून नेणार असाल तर आम्ही आमची लढाई कायदेशीर लढू.
- स्वतःच्या आमदारांवरचा एवढा अविश्वास का ?
- राज्याच्या इतिहासात असे सरकार प्रथम पाहिले
- १७० आमदार पाठीशी मग नियम का बदलले
- विधानसभा अध्यक्ष मुद्यावरून टीकेची झोड
- इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही