विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी उभी फूट पडून शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ दोन्ही गट एकाच पक्षावर दावा सांगत असताना शरद पवारांबरोबर 40 वर्षांहून अधिक काम केलेल्या जुन्या जाणत्या निकटवर्तीयांना मात्र शरद पवार यांच्याच विषयी मोठा संशय वाटतो आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पाडण्याचा शरद पवारांचा डाव असल्याची वक्तव्ये जुन्या जाणत्या निकटवर्तीय नेत्यांनी केली आहेत. Old acquaintances close to Sharad Pawar are still suspicious
दिल्लीच्या भाजप हेडक्वार्टर्स मधून राष्ट्रवादी फोडण्याचा डाव खेळला गेला, असा आरोप शरद पवारांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत केला असला, तरी शरद पवारांचे एकेकांचे निकटवर्ती चंद्रराव तावरे आणि वसंतदादा पाटलांच्या पत्नी शालिनीताई पाटील या दोन ज्येष्ठ नेत्यांना मात्र राष्ट्रवादीत फूट पाडणे हा शरद पवारांचा डाव असल्याची खात्री आहे. शरद पवार यांना आपल्या पुतण्या भोवतीचे आणि आपल्या मंत्र्यांभवतीचे ईडी सीबीआय यांचे फार आवळलेले फास ढिले करायचे आहेत. आपल्या छत्रछायेखाली झालेल्या भ्रष्टाचाराला कायमचे झाकून ठेवायचे आहे म्हणूनच अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपच्या वळचळणीला पाठवून शरद पवारांनी हा डाव खेळला आहे, असे वक्तव्य चंद्रराव तावरे यांनी केले आहे.
चंद्रराव माळेगाव साखर कारखान्याचे संस्थापक आणि पवारांचे 40 वर्षांपेक्षा अधिक निकटवर्ती होते. सध्या ते भाजपमध्ये आहेत. पवारांच्या कुटुंबा मधल्या प्रत्येक व्यक्तीशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. या संबंधांचा हवाला देऊनच तावरे यांनी पवारांविषयीचा संशय वाढवला आहे किंबहुना तावरे यांना राष्ट्रवादीतील फूट शरद पवारांनीच घडविल्याची खात्री आहे आहे. भाजपनेच शरद पवारांपासून सावध राहावे, असे वाटते आहे.
शालिनीताई पाटलांचा दुजोरा
चंद्रराव तावरे यांच्याच मताला शालिनीताई पाटलांनी पण दुजोरा दिला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बाकीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांना शिक्षा व्हायची वेळ आली. हायकोर्टाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केले. आता निकाल येतील. सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा, 45 साखर कारखाने खासगीकरण घोटाळा हे सगळे शरद पवारांच्या छत्रछायेखाली घडले आणि अजित पवारांनी ते घडवून आणले. ते अपराधी आहेत. त्यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात केस आहे. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांच्या गळयाभोवतीचे केसचे फास सोडवण्यासाठीच शरद पवारांनी अजित पवारांना भाजपच्या आश्रयाला पाठवले किंवा अजित पवार स्वतः गेले. काही असले तरी अजित पवार भाजपच्या आश्रयाला गेले, असा आरोप शालिनी पाटलांनी केला.
चंद्रराव तावरे आणि शालिनीताई पाटील यांनी शरद पवारांबरोबर वर्षानुवर्षे काम केले आहे. शरद पवारांच्या कामाची पद्धत त्यातल्या खाचा खोचा या दोन्ही नेत्यांना पक्क्या माहिती आहेत आणि या माहितीतूनच या दोन जुन्या जाणत्या निकटवर्तीय नेत्यांनी शरद पवारांभोवतीचे संशयाचे जाळे अधिक गडद केले आहे.
पवार आता महाराष्ट्र दौऱ्याची येवल्यापासून सुरुवात करत आहेत. आपण लढवय्ये आहोत. आपण रिटायर होणार नाही, असे त्यांनी मुंबई तक्रार दिलेल्या मुलाखतीत अटल बिहारी वाजपेयी आणि मोरारजी देसाई यांची यांचे हवाले देऊन सांगितले आहे, तरी त्यांच्याभोवतीचे संशयाचे जाळे मात्र फिटलेले नाही. उलट जुन्या जाणत्या निकटवर्ती नेत्यांच्या वक्तव्यांमुळे ते अधिक गडद झाले आहे.
Old acquaintances close to Sharad Pawar are still suspicious
महत्वाच्या बातम्या
- 72 हुरें चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांना सुरक्षा; सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या
- बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप
- राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकांना कायमच वाटाण्याच्या अक्षता; पवारांनी “लोकशाही”ला दाखवला नेहमीच चव्हाटा!!
- Liquor policy scam : ‘ईडी’ने मनीष सिसोदियांच्या दोन मालमत्तांसह तब्बल ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!