विशेष प्रतिनिधी
नाशिक : पुण्यक्षेत्र काशीतील श्री गंगा मातेच्या आरतीच्या धर्तीवर गंगा गोदावरी मातेची नियमित आरती व्हावी, यासाठी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने पहिला 10 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर ही आरती 19 फेब्रुवारी शिवजयंती पासून सुरू होणार आहे. परंतु, पुरोहित संघातील काहीजणांच्या व्यक्तिगत अहंकारामुळे सुरवातीलाच गोदावरी आरती मध्ये अडथळा उत्पन्न झाला आहे.Obstruction of personal ego in Godavari Aarti; Attempts to incite Saints; Heritage language for government funding!!
वंशपरंपरागत पुरोहितांकडेच या आरतीची व्यवस्था सोपवावी. इतरांचा या आरतीशी काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेत पुरोहित संघाच्या काही सदस्यांनी नाशिक मधील संत महंतांना भडकविण्याचे प्रयत्न केले. यातून गोदावरी आरतीच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना धक्का लावण्याचा इरादा समोर आला आहे.
नाशिक मध्ये गंगा गोदावरी आरती करण्याचा अधिकार फक्त तीर्थपुरोहितांचाच आहे. इतरांचा नाही. त्यामुळे शासकीय निधीतून होणारी आरती गंगा गोदावरीचे तीर्थपुरोहितच करतील. इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका पंचकोटी पुरोहित संघाने घेतली. परंतु या भूमिकेमुळे वंशपरंपरेचे अधिकार आणि राज्यघटनेने दिलेले धर्म स्वातंत्र्याचे अधिकार यात संघर्ष उत्पन्न झाला आहे. त्याचबरोबर पंढरपूर आणि कोल्हापूर येथे काही वंशपरंपरागत पुरोहित आणि सेवेकऱ्यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे अनेकांचे हक्क गेले. ते राज्यघटना आणि कायद्याच्या कसोटीवर टिकू शकले नाहीत. तशीच अवस्था नाशिक मध्ये गोदावरी आरतीच्या वंशपरंपरेच्या हक्कासंदर्भात होण्याची शक्यता आहे.
शिवाय कुठलाही शासकीय निधी हा कुठल्याही खासगी संस्थेस कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन देताच येत नाही. त्याचबरोबर त्या निधीची संपूर्ण व्यवस्था शासकीय नियंत्रणाशिवाय खासगी संस्थेकडे सोपविताही येत नाही. त्यामुळे शासकीय निधीतून गंगा गोदावरी आरती करायची, पण निधीचे संपूर्ण नियंत्रण आपले ठेवायचे, ही भूमिका पुरोहित संघाला भविष्यकाळात घातक ठरू शकते. केवळ व्यक्तिगत अहंकारापोटी गंगा गोदावरी आरती मध्ये अडथळा आणून सगळ्या नाशिककरांच्या आणि देशा-परदेशातून इथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या भक्तीभावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे.
गंगा गोदावरी क्षेत्री येऊन लाखो भाविक आपली विविध धार्मिक कृत्ये करतात. त्या निमित्ताने पुरोहितांपासून अनेकांना व्यवसाय, रोजगार त्यातून मिळतात. या व्यवसाय – रोजगारालाही अशा व्यक्तिगत अहंकाराच्या भूमिकेतून फटका बसू शकतो. त्यामुळे पुरोहित संघाने संकुचित भूमिका घेऊन आरती मध्ये अडथळा उत्पन्न करण्यापेक्षा, ती अधिकाधिक सर्वसमावेशक कशी होईल, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना हजारो नाशिककर व्यक्त करत आहेत.
Obstruction of personal ego in Godavari Aarti; Attempts to incite Saints;Heritage language for government funding!!
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्प 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार!
- सीतारामन यांच्या बडतर्फीची मागणी पडली महागात, आयआरएस अधिकारी निलंबित
- ED च्या धसक्याने झारखंडमध्ये उलटफेर; कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करायचा निर्णय बारगळला; चंपई सोरेन यांची करावी लागली निवड!!
- राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याएवढाच ज्ञानवापीचा निर्णय महत्त्वाचा; व्यास तळघरात पूजेचा अधिकार; हे व्यास तळघर आहे तरी काय??