विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या ज्या ऐतिहासिक भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महापालिकेने सुप्रीम कोर्टातला खटला जिंकला आहे. या संदर्भातली माहिती राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडल वर दिली आहे. Obstacle removed from historic Bhide Wada becoming a national monume
भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. त्याचा खटला सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. दरम्यानच्या काळात जानेवारी 2018 मध्ये भिडे वाडा वास्तूचे सध्याचे मालक पुन्हा मर्चंट बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे यांच्याशी त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांतदादांनी चर्चा करून त्याविषयीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. विजय ढेरे यांनी चंद्रकांत दादांना अनुकूल प्रतिसाद दिला होता.
त्यानंतर सुप्रीम कोर्टातली केस राज्याचे महाधिवक्ता बिरेन्द्र सराफ यांनी लढवली. सुप्रीम कोर्टाने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यास मान्यता दिली असून पुणे महापालिकेला अनुकूल निकाल दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाच्या दृष्टीने विकासाचे काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे.
यासंदर्भात चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले ट्विट असे :
अभिनंदन पुणेकर! पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. शासनाकडून निधीची तरतूद झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भिडेवाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली होती. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही केली होती. त्यानुसार महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. लवकरच आता भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर होईल, याबद्दल सर्व पुणेकरांचे अभिनंदन!!
Obstacle removed from historic Bhide Wada becoming a national monume
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!