• Download App
    ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हर्च्युअल शिक्षणामुळे लठ्ठपणात प़डतेयं मोठी भर। Obesity increasing due to work from home

    ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हर्च्युअल शिक्षणामुळे लठ्ठपणात प़डतेयं मोठी भर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हर्च्युअल शिक्षण पद्धती’ने मोठ्या व्यक्ती आणि बालकांमध्ये अतिखाणे, ताणतणाव अती खादाडपणा तसेच वजन वाढण्याच्या समस्या वाढल्या आहेत. एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के लोकसंख्येमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे ‘आयसीएमआर-इंडियाबी’ ने आपल्या अभ्यासात म्हटले आहे. देशभरातील महत्त्वाच्या शहरांतील लोकांचा आरोग्यविषयक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्यविषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज ‘आयसीएमआर-इंडियाबी’च्या अभ्यासात अधोरेखित झाली आहे. पुढील २० वर्षांत २०४० पर्यंत विकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. Obesity increasing due to work from home



    ‘आयसीएमआर-इंडियाबी’ने जगभरात केलेल्या अभ्यासानुसार १३५ दशलक्ष व्यक्ती लठ्ठपणा आणि वजन व्यवस्थापन समस्येने त्रस्त असल्याचे सांगितले होते; तर डिसेंबर २०२० दरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणानुसार बहुसंख्य महिला लठ्ठपणाच्या विकाराने त्रस्त असून ग्रामीण भागांमध्ये ही आरोग्य समस्या वेगाने वाढत असल्याचे सांगितले होते.

    आपले आरोग्य उत्तम राखण्याकरिता वजन व्यवस्थापन हा मुख्य निकष असल्याचे अनेक जणांना वाटते; मात्र ते पुरेसे नसून त्यासाठी ‘बॉडी मास इंडेक्स’सारख्या पद्धतींचा वापर महत्त्वाचा आहे. यामुळे शरीराचे वयोमान, चरबीचे प्रमाण, स्नायूंची घनता इत्यादी अनेक घटकांची शरीरातील हालचाल टिपणे शक्य होते.

    शरीराचा बीएमआय ३० किंवा त्याच्या वर असल्यास लठ्ठपणा आणि २५-३० बीएमआय असल्यास अतिवजन असण्यावर शिक्कामोर्तब होते. आपल्या शरीरात कमरेच्या खालच्या भागातील अवयवांच्या भोवती जमलेली चरबी म्हणजे बीएमआयसंबंधी चरबी होय. यामुळे हृदय रोग, उच्च रक्तदाब, श्वसनाच्या समस्या व अन्य विकार उद्भ वू शकतात.

    Obesity increasing due to work from home

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!