• Download App
    Prakash Ambedkar OBC समाजाने सवर्णांना मतदान करू नये; सगळ्यांची राजकीय आणि सामाजिक ओळख OBC म्हणूनच निर्माण करावी; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

    OBC समाजाने सवर्णांना मतदान करू नये; सगळ्यांची राजकीय आणि सामाजिक ओळख OBC म्हणूनच निर्माण करावी; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळेच वक्तव्य करून मोठ्या राजकीय वादाला फोडणी दिली. ओबीसी समाजाने सवर्णांना मतदान करू नये. त्या उलट आपल्या सगळ्यांची राजकीय आणि सामाजिक ओळख ओबीसी म्हणूनच निर्माण करावी, अशी सूचना प्रकाश आंबेडकर यांनी केली. Prakash Ambedkar

    धनगर समाजासाठी दीपक बोराडे यांनी 15 दिवसांपासून जालना येथे उपोषण सुरु केले होते. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी २ ऑक्टोबरला उपोषण मागे घेतले आहे. या पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी आता धनगर समाजानेचे ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व केले पाहीजे अशी मागणी केली आहे. ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. परंतू तेलंगणा राज्यासारखे ते ६२ टक्क्यांवर देखील नेता येईल असे प्रकाश आंबडेकर असे यावेळी आंबेडकर म्हणाले. धनगर समाजाने महाराष्ट्र विधानसभेची सत्ता हाती घेऊन हे आरक्षण वाढवावं तरच समाजाला न्याय मिळेल असेही प्रकाश आंबडेकर यावेळी म्हणाले.ओबीसींनी या राज्याची सत्ता हाती घ्यावी आणि आता लोकांनीही SC आणि ST उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. जर ते नसतील तर मुस्लीम उमेदवारांना मतदान केलं पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबडेकर यांनी केली आहे. सवर्ण लोकांनी लोकांनी अन्याय केलेला आहे.



    ओबीसी लोकांनी या सवर्णांना मतदान करू नये असे आवाहन मी त्यांना करतो, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. आपली सगळ्यांची सामाजिक आणि राजकीय ओळख आता OBC म्हणूनच झाली पाहिजे. या सगळ्यांना एकत्रित आणलं पाहिजे. सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्याची ओळख OBC झाली पाहिजे, असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

    मला मुख्यमंत्री आणि मंत्री व्हायचं नाही !

    ओबीसी समाजाचं नेतृत्व आपण करत आलो आहे. १९८० पासून आम्ही ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आलो आहे, यात तसूभर देखील बदल केलेला नाही. आमच्या समाजात प्रमाणिक नेता होत नाही याची खंत आहे.ओबीसी लोकांनी सत्ता आणली पाहिजे. मला मुख्यमंत्री आणि मंत्री व्हायचं नाही, लोकांना सत्तेत आणणे हे काम महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी केलं आणि तेच कार्य पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. खंडोबा या देवाला गोळवलकर पासून मोहन भागवत यांनी एकदा तरी भेट दिली आहे का ? हे दाखवा असाही सवाल यावेळी आंबेडकर यांनी केला.

    OBC community should not vote for upper castes Prakash Ambedkar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज्यासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न; ऊर्जेच्या स्रोतांमध्ये परिवर्तन आवश्यक; ‘फ्लेक्स-इंजिन’नंतर सीएनजी मोठा बदल

    Raju Shetti : राजू शेट्टींचा इशारा- शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, अन्यथा कुणाचीही दिवाळी सुखात होऊ देणार नाही!

    नाशिक मधल्या जैन समाजाच्या णमोकार तीर्थ पर्यटन विकासासाठी शासनाचे विशेष लक्ष; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही