Saturday, 10 May 2025
  • Download App
    जलील यांची बोलंदाजी, MIMचे डॅमेज कंट्रोल : इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याची पक्षाने केली सारवासारव, नुपूर शर्मांना थेट फाशी देण्याची केली होती मागणी|'Nupur should be hanged', AIMIM MP demands, Owaisi's party had to do damage control

    जलील यांची बोलंदाजी, MIMचे डॅमेज कंट्रोल : इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याची पक्षाने केली सारवासारव, नुपूर शर्मांना थेट फाशी देण्याची केली होती मागणी

    वृत्तसंस्था

    औरंगाबाद : एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर पक्षाकडून सावध पवित्रा घेत भूमिका जारी करण्यात आली आहे. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर पक्षाने ट्विट करून नुपूर शर्माच्या अटकेची आणि वेळीच कारवाईची मागणी केली आहे.’Nupur should be hanged’, AIMIM MP demands, Owaisi’s party had to do damage control



    औरंगाबादचे लोकसभा खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी नुपूर शर्मा यांना पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल फाशीची शिक्षा द्यावी, असे म्हटले होते. अशा गोष्टी सहज सोडल्या तर थांबणार नाहीत. कोणत्याही जात, धर्म किंवा पंथाच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा आणला पाहिजे, असे ते म्हणाले होते.

    भाजपवर आरोप करताना ते म्हणाले, नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कसली कारवाई आहे? वेळीच कारवाई होत नाही, त्यामुळे अशी आंदोलने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

    अनेक ठिकाणी हिंसाचार

    नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात विशिष्ट समुदायाच्या लोकांनी निषेध केला. यादरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनाही घडल्या. उत्तर प्रदेशात सहा जिल्ह्यांतील 130 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. प्रयागराज आणि सहारनपूरमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. प्रयागराजमध्ये काही मोटारसायकल आणि वाहने जाळण्यात आली आणि पोलिसांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    भाजपने हकालपट्टी केली होती

    वास्तविक, भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. हे या आंदोलनाचे प्रमुख कारण आहे. नुपूरच्या वक्तव्यानंतर 15 हून अधिक अरब देशही संतापले होते. अनेक ठिकाणी भारतीय उत्पादनांचा वापर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर भारत सरकारने कठोर पावले उचलत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.

    ‘Nupur should be hanged’, AIMIM MP demands, Owaisi’s party had to do damage control

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Icon News Hub