• Download App
    महाराष्ट्रात वाघांची संख्या 312 वरून 390 वर!!; व्याघ्र भ्रमण मार्गातील विकासाचे 19 प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे Number of tigers in Maharashtra from 312 to 390

    महाराष्ट्रात वाघांची संख्या 312 वरून 390 वर!!; व्याघ्र भ्रमण मार्गातील विकासाचे 19 प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात वाघांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पेंच प्रकल्पात मूल्यांकनात उत्तम कामगिरी केली आहे. Number of tigers in Maharashtra from 312 to 390

    मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक आज मंत्रालयात पार पडली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.


    ‘Project Tiger’चे यश केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद – पंतप्रधान मोदी


    राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० झाली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे. त्याबद्दल आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

    आज झालेल्या बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हीटीसाठी भूमिगत ऑप्टिकल फायबर केबलचे प्रस्ताव, रस्ते प्रकल्पांचे प्रस्ताव तसेच अन्य विकास कामांच्या प्रस्तावांचा समावेश होता. आजच्या बैठकीत १९ प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळास शिफारशीसाठी सादर करण्यात आले.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते महाडाटा वेब पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदींसह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    Number of tigers in Maharashtra from 312 to 390

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!