विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोरोना महामारीचा काळ आला आणि मागील दोन वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा बेड पासून औषध, डॉक्टर नर्सेस यांची कमतरता होती. दुसरी लाट आली तेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा संपूर्ण भारतात होता. फक्त वेळेवर ऑक्सिजन बेड न मिळाल्यामूळे माणसे मरण पावली.
Now there will be annihilation of bogus doctors and their bogus degrees: Kolhapur District Collector Rahul Rekhawar
खाजगी दवाखान्यात 2 लाख रुपये भरून श्रीमंत लोक बेडचे ऍडव्हान्स बुकिंगही करत होते. दवाखान्यात होणारा खर्च पाहून लोक दवाखान्यात जायला नको म्हणू लागले. औषधांचा अवाढव्य खर्च, ऑक्सिजन बेडचे वेगळे चार्जेस अश्या एक ना अनेक खर्चाच्या गोष्टी पाहुन हॉस्पिटलसनी चालवलेला पैश्याचा खेळ नाही म्हटलं तर सर्वांना दिसत होता पण नाईलाज म्हणून लोक बुडत्याला काडीचा आधार सारखे सहन करत होतेच.
कोल्हापूरमध्ये भक्तांसाठी तात्पुरता स्कायवॉक बनवण्यात येणार आहे
ह्या काळात बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. ऑक्सिजनची कमतरता, अवाढव्य न पडवडणारा खर्च ही कारणे असतीलही. तरी बऱ्याच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाटही ह्या काळात वाढला आहे. अशाच काही बोगस पदव्या घेतलेल्या सो कॉल्ड डॉक्टर लोकांना राधानगरी, भुदरगड आणि करवीर तालुक्यात अटक करण्यात आली होती. ही अटक मागील मार्च ते सप्टेंबर या काळात झाली आहे.
असे बोगस डॉक्टर आणि त्यांनी प्रिस्क्राइब केलेली औषधे जे फार्मासिस्ट देतील या सर्वांवर कारवाई केली जाईल. असे कोल्हापूर जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले आहे. अशा डॉक्टरांसोबत काम करणार्या सर्व कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. लोकल पोलिस ऑफिसर्सना या कामात मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
Now there will be annihilation of bogus doctors and their bogus degrees: Kolhapur District Collector Rahul Rekhawar
महत्त्वाच्या बातम्या
- देशात अनेक ठिकाणी जीमेल सेवेत व्यत्यय, युजर्सना लॉगिन आणि प्रवेशात अडचण, सोशल मीडियावर #GmailDown ट्रेंडिंगवर
- Retail Inflation : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाईपासून मिळाला दिलासा, किरकोळ महागाई दर 4.35 टक्क्यांवर
- Coal Shortage : कोळशाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात वीज कमी पडू देणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ग्वाही, ग्राहकांना काटसरीने वीज वापराचे आवाहन
- Coal Crisis : केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “आम्ही राज्यांना कोळशाचा साठा वाढवण्यास सांगितले होते, पण त्यांनी तसे केलेच नाही!”
- हवाई प्रवासासंदर्भात मोठा निर्णय, देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध हटवले, आता 100 टक्के प्रवासी क्षमतेला मुभा