Sameer Wankhede : क्रूझ ड्रग्ज प्रकरणापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाद चिघळला आहे. मलिकांनी सातत्याने विविध आरोप केले आहेत. ड्रग्ज प्रकरणातील एका साक्षीदारानेही वानखेडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी तर समीर वानखेडे यांचे काही जुने फोटो व त्यांच्यासंबंधीची काही कागदपत्रे शेअर करून ते समीर दाऊद वानखेडे असल्याचे संबोधित केले आहे. या आरोपांवर आता समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली आहे. Now Kranti Redkar Reply To Nawab Malik, shared old photos and says- Sameer Wankhede and I are both Hindus by birth
प्रतिनिधी
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाद चिघळला आहे. मलिकांनी सातत्याने विविध आरोप केले आहेत. ड्रग्ज प्रकरणातील एका साक्षीदारानेही वानखेडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी तर समीर वानखेडे यांचे काही जुने फोटो व त्यांच्यासंबंधीची काही कागदपत्रे शेअर करून ते समीर दाऊद वानखेडे असल्याचे संबोधित केले आहे. या आरोपांवर आता समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
क्रांती रेडकरने ट्वीटरवर दोन फोटो पोस्ट करून आपले म्हणणे मांडले आहे. क्रांती रेडकरने ट्विट करत म्हटले की, मी आणि माझे पती समीर जन्माने हिंदू आहोत. आम्ही इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केलेले नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीर यांचे वडीलही हिंदू होते. त्यांनी माझ्या मुस्लीम सासूशी विवाह केला होता. त्या सध्या जिवंत नाहीत. समीर यांचा पहिला विवाह स्पेशल मॅरिज ॲक्टनुसार झाला होता. त्यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. तर आमचा विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार २०१७ मध्ये झाला.
दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या आधीच्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. समीर दाऊद वानखेडे का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा! अशी कॅप्शन लिहून त्यांनी समीर वानखेडे यांचा दाखला ट्विट केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पेहचान कौन? असे लिहून समीर वानखेडे यांचा एक जुना लग्नातील क्रॉप केलेला फोटो पोस्ट केला.
मलिकांच्या आरोपांनंतर सोशल मीडियावर वानखेडे हिंदू की मु्स्लिम अशी चर्चा रंगलेली असताना क्रांती रेडकरने स्पष्टीकरणासाठी आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कागपत्रामुळे समीर वानखेडे यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होत असलेल्या दाखला खोटा असून, या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर ती घेण्यासाठी माझ्या मूळ गावी वरुड तोफा, ता. रिसोड जि.वाशिम येथे जा आणि तपासा असेही म्हटले आहे.
दरम्यान, क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एका साक्षीदाराने वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने त्यांची विभागीय चौकशी केली जाणार असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. यासाठी वानखेडे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले आहे.
Now Kranti Redkar Reply To Nawab Malik, shared old photos and says- Sameer Wankhede and I are both Hindus by birth
महत्त्वाच्या बातम्या
- नितीन गडकरी, शरद पवार यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट
- नवाब मलिक यांच्या आरोप नंतर समीर वानखेडे यांच्या वडिलांची प्रतिक्रिया आली समोर
- नाशिकमध्ये २१ ऑक्टोबरच्या छाप्यांमध्ये १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती मिळालीय, तपास अजूनही सुरू; केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा खुलासा
- IND vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर मोहम्मद शमीला करण्यात आले ट्रोल , सेहवाग आणि ओवेसी यांनी दिले चोख प्रत्युत्तर
- National Film Award 2021 : ‘ छिछोरे ‘ ला मिळाला सर्वश्रेष्ठ हिंदी फिल्म पुरस्कार , साजिद नाडियाडवाला आणि नितेश तिवारी ने सुशांत सिंहला केला समर्पित