• Download App
    आता सीबीआय कोर्टात अनिल देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता; अडचणींमध्ये वाढ । Now it is likely to seek custody of Anil Deshmukh in CBI court; Increase in difficulties

    आता सीबीआय कोर्टात अनिल देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता; अडचणींमध्ये वाढ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता सीबीआय अनिल देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या केसच्या आधारे EDकडून PMLA केस केली. त्यानंतर आता सीबीआय अर्ज करून कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झी २४ तासने ही बातमी दिली आहे. Now it is likely to seek custody of Anil Deshmukh in CBI court; Increase in difficulties

    मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीच्या विशेष कोर्टान हा निर्णय सुनावला आहे. सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी बार मालकांची यादी दिली होती, त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जात होती असा दावा ईडीने सुनावणीत केला. या प्रकरणात देशमुख – वाझेंचा मोठा सहभाग असल्याचे ईडीने नमूद केले आहे.



    अनिल देशमुख सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. त्यानंतर ईडीने 12 तास चौकशी करुन त्यांना अटक केली होती. तर शनिवारी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

    अनिल देशमुखनंतर मुंबईतील ईडी कार्यालयात ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. पण ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.

    Now it is likely to seek custody of Anil Deshmukh in CBI court; Increase in difficulties

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा