Punjab Congress : 40 आमदारांच्या बंडाळीमुळे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीच आता पक्षात बंड सुरू केले आहे. अमरिंदर सिंग यांनी थेट म्हटलंय की, जर काँग्रेसने सिद्धू यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले तर अमरिंदर त्यांच्या विरोधात मजबूत उमेदवार उभे करणार. Now Captain Amrinder revolt in Punjab Congress; Said- Rahul-Priyanka inexperienced, misguided by their advisors
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : 40 आमदारांच्या बंडाळीमुळे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीच आता पक्षात बंड सुरू केले आहे. अमरिंदर सिंग यांनी थेट म्हटलंय की, जर काँग्रेसने सिद्धू यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले तर अमरिंदर त्यांच्या विरोधात मजबूत उमेदवार उभे करणार.
अमरिंदर यांनी सिद्धू यांना नवीन सरकारमध्ये सुप्रीम सीएम केल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर पहिल्यांदाच अमरिंदर यांनी राहुल आणि प्रियांका गांधींवरही सडकून टीका केली. अमरिंदर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अनुभवहीन म्हटले. त्यांचे सल्लागार त्यांची दिशाभूल करत असल्याचेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी खुलासा केला की, त्यांनी तीन आठवड्यांपूर्वी सोनिया गांधींना राजीनामा देऊ केला होता, परंतु त्यांनी पदावर कायम राहण्यास सांगितले होते. ते म्हणाले, ‘जर त्यांनी मला पायउतार होण्यास सांगितले असते तर मी लगेच निघून गेलो असतो.’ ते म्हणाले, ‘एक सैनिक असल्याने मला कसे काम करायचे ते माहिती आहे.’
गांधी भावा-बहिणीची सल्लागारांकडून दिशाभूल
ते म्हणाले की, त्यांनी सोनिया गांधींना सांगितले होते की, पंजाबमध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर ते आपले पद सोडण्यास तयार आहेत. पण तसे झाले नाही. म्हणूनच मी लढणार आहे. ते म्हणाले की, विधिमंडळ पक्षाची बैठक गुप्तपणे बोलवण्यात आली होती, ज्यामुळे त्यांना अपमानित वाटले. कॅप्टन म्हणाले, ‘मी कोणत्याही आमदाराला गोवा किंवा अन्य ठिकाणी घेऊन जात नाही. मी ते करत नाही. मी गंमत करत नाहीये. गांधी भावाबहिणीला माहिती आहे की हा माझा मार्ग नाही. ते म्हणाले की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे मला मुलांसारखे आहेत आणि त्यांच्यासोबत जे घडले ते पाहून ते दुखावले आहेत. कॅप्टन म्हणाले की, गांधी भावंडे अननुभवी आहेत आणि त्यांचे सल्लागार त्यांची दिशाभूल करत आहेत.
आपले सर्व राजकीय पर्याय खुले असल्याबद्दल ते म्हणाले की, मी जवळच्या लोकांशी बोलत आहे. आपल्या वाढत्या वयावर विनोद करत ते म्हणाले, ‘तुम्ही 40व्या वर्षी वृद्ध आणि 80व्या वर्षी तरुण होऊ शकता. आपल्या वाढत्या वयाला कधीही अडथळा म्हणून पाहिले नाही. 7 वेळा विधानसभेचे आणि दोन वेळा संसद सदस्य राहिलो आहे. माझ्याबरोबर योग्य वर्तन व्हायला हवे होते.
जे माझ्या तक्रारी करायचे, तेच आता सत्तेत
बदनामीच्या आरोपांवर आणि अंमली पदार्थांच्या प्रकरणात बादल आणि मजीठिया यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याबद्दल कॅप्टन म्हणाले की, कायद्याला वाटचाल करू देण्यावर त्यांचा विश्वास आहे. कॅप्टन म्हणाले की, ‘जे माझ्याविरोधात तक्रार करायचे आता ते सत्तेत आहेत, त्यांनी अकाली नेत्यांना जेलमध्ये टाकावे.’ खाण माफियांमध्ये सामील असलेल्या मंत्र्यांवर कारवाई न केल्याबद्दल सिद्धू यांचा खरपूस समाचार घेत कॅप्टन म्हणाले, “आता तोच मंत्री त्याच्यासोबत आहे.”
कॅप्टन अमरिंदर म्हणाले की, वेणुगोपाल किंवा अजय माकन किंवा रणदीप सुरजेवाला हे कोणत्या मंत्रालयासाठी कोण योग्य हे ठरवतात. राज्याचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव न घेता ते म्हणाले, “आपला धर्म शिकवतो की आपण सर्व समान आहोत. मला लोक त्यांच्या जातीच्या आधारावर दिसत नाहीत. मी त्यांना क्षमतेच्या आधारावर पाहतो.
Now Captain Amrinder revolt in Punjab Congress; Said- Rahul-Priyanka inexperienced, misguided by their advisors
महत्त्वाच्या बातम्या
- लेटरवॉर : ‘राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर का टांगताय?’, भाजपच्या 12 महिला आमदारांनी पत्र लिहून काढले ठाकरे सरकारचे वाभाडे, वाचा संपूर्ण पत्र..
- इम्रान सरकार चीनच्या मुठीत, पीओकेमध्ये वाढतंय ड्रॅगनचे वर्चस्व; 2025 पर्यंत पाकिस्तानात चिनी कामगारांची संख्या 50 लाखांवर जाणार
- भवानीपूरच्या सभेत ममतांनी सांगितले एकेका मताचे महत्त्व, म्हणाल्या- मत नक्की द्या, पराभव झाल्यास मुख्यमंत्रिपदी राहू शकणार नाही!
- अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात 10 वर्षांत अदानी ग्रुप करणार 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, अंबानींना देणार टक्कर
- वाचा.. कोण आहेत मौलाना कलीम सिद्दिकी? यूपीतील बडे प्रस्थ, अभिनेत्री सना खानचा निकाह आणि सरसंघचालकांशी भेटीमुळे चर्चेत… आता धर्मांतरप्रकरणी अटक