विशेष प्रतिनिधी
बीड : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून 25 वर्षे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीत गुंड, वाळू माफिया, राख माफिया यांची भरती केली, पण आता बीडमध्ये जाऊन अजितदादांना त्यांचीच झाडाझडती घ्यावी लागली. देवेंद्र फडणवीस सरकारचा हा “इफेक्ट” बीडमध्ये आज दिसला.Now Ajit Pawar targets NCP goons in Beed
पालकमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये सकाळी लवकर पोहोचले. तिथे त्यांनी हेलिपॅड वरूनच अधिकाऱ्यांची झाडावरती यायला सुरुवात केली. मला सगळी माहिती अपडेट पुढच्या चार तासात मिळाली पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात पोहोचले तिथे त्यांनी बीड म्हटलं की गुंड, वाळू माफिया, राख माफिया अशी प्रतिमा निर्माण झाली आहे, ती बदलली पाहिजे. आता असल्या सगळ्या माफियांना सुतासारखं सरळ गेले पाहिजे, असे वक्तव्य केले.
पण अजितदादा अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच याच बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून गुंड, राख माफिया, वाळू माफिया यांची भरती होत होती. त्यावेळी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, किंबहुना अनेक ठिकाणी “आशीर्वाद” देखील दिले होते, पण आता हे सगळे प्रकरण अंगलट आल्याने अजितदादांना आपल्याच पक्षातली झाडाझडती घ्यायला लागली. याला कारणीभूत खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ठरले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर बीडचे पालकमंत्री पद मुद्दामच अजितदादांना दिले गेले, जेणेकरून त्यांच्याच पक्षाने निर्माण केलेली घाण त्यांनीच निस्तरावी, असे यातून ठरवले गेले. त्यामुळे अजितदादांना बीडमध्ये येऊन आपल्याच पक्षातल्या गुंड, वाळू माफिया, राख माफिया यांना दमबाजी करावी लागली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात अजितदादांचे भाषण याच गुंड, वाळू माफिया, राख माफिया यांच्या भोवती गुंफले गेले होते. त्यातच मध्येच त्यांनी अधिकाऱ्यांनाही झापून घेतले. बीड मधले काही अधिकारी इथल्या इथेच बदली करून घेतात. आष्टी, पाटोदा, गेवराई, आंबेजोगाई या पलीकडे ते जातच नाहीत. आता त्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत, असे अजितदादा म्हणाले.
पण अजितदादांच्या या दौऱ्याकडे धनंजय मुंडे यांनी पाठ फिरवली, त्यासाठी त्यांनी तब्येतीचे कारण दिले. अचानक तब्येत बिघडल्याने तपासणी साठी मुंबईला यावे लागले म्हणून अजितदादांच्या दौऱ्यात सहभागी होता येत नाही, असे ट्विट त्यांनी केले.
Now Ajit Pawar targets NCP goons in Beed
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात ए.आय. आधारित डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी
- Waqf board bill : उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सिद्ध करायची संधी, चतुर असतील तर करू शकतात पुढची राजकीय पेरणी!!
- Kapil Mishra : दिल्ली दंगलीप्रकरणी कपिल मिश्रा यांना मोठा धक्का
- Reserve Bank of India : भारताची आर्थिक प्रगती संचलित करणारी भारतीय रिझर्व्ह बँक!