• Download App
    कुविख्यात आंतरराज्य गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; सोलापूर ग्रामीण एलसीबीची नांदनी येथे कारवाई । Notorious interstate criminal police nets; Action of Solapur Rural LCB at Nandani

    कुविख्यात आंतरराज्य गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; सोलापूर ग्रामीण एलसीबीची नांदनी येथे कारवाई

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदनी येथील परमिटरूमवरील दरोड्यासह मंद्रूप ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या आणि कामती ठाण्याच्या हद्दीतील एक घरफोडी करणारा सराईत कुविख्यात आंतरराज्य गुन्हेगार पोलिसांना मिळून आला. Notorious interstate criminal police nets; Action of Solapur Rural LCB at Nandani

    त्याच्याकडून ८ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात सोलापूर ग्रामीण एलसीबी पथकाला यश आले आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदनी येथील हॉटेल निसर्ग वर ६ फेब्रुवारी रोजी दरोडा पडला होता.यामध्ये फिर्यादी गंगाराम वाघमोडे यांच्या खिशातील २० हजार रुपये आणि इंपिरियल ब्लू कंपनीचे २८ दारूचे बॉक्स असे एकूण २ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला होता.



    याबाबत तपास केला असता दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि त्याचे साथीदाराने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या अनुषंगाने सापळा रचून त्यांना पकडण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

    Notorious interstate criminal police nets; Action of Solapur Rural LCB at Nandani

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार आडनावाच्या नातवंडांविरुद्ध कधीच लढणार नाही; गरज पडल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

    आमच्यात कसलीही स्पर्धा नाही; आम्ही ‘इन्फ्रा फॅमिली’, एकनाथ शिंदेंसोबतच्या श्रेयवादाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

    मी जे करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून नाही; अशोक खरात प्रकरणावर एकनाथ शिंदेंचे उत्तर