प्रतिनिधी
मुंबई : तब्बल 13000 हजार जणांना 149 कलमानुसार नोटिसा, 15000 जणांवर कारवाई अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्रातले जे राजकीय वातावरण तापले आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे – पवार सरकार मशिदींवरचे भोंगे उतरवण्या ऐवजी राज ठाकरे आणि मनसे यांच्यावरच कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. Notice to 13000 Mansainiks Action against 15000 people
राज ठाकरे यांना आधीच यांच्या विरोधात आधीच 2008 च्या केसेचे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे आणि त्यापलिकडे जात 13000 मनसैनिकांना नोटीस बजावली असल्याची माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. 15000 जणांवर कारवाई आणि 13000 जणांना नोटीसा, असे या कारवाईचे स्वरूप आहे.
प्रमुख मनसैनिकांना आणि नेत्यांना मुंबई बाहेर जाण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. मनसेवर चहुबाजूंनी कठोर कारवाईचा बडगा उगारून उद्याची महाआरती हाणून पाडण्याचीच तयारी ठाकरे – पवार सरकारने चालवली आहे.
यापुढे महाराष्ट्रात ॲक्शन दिसेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
Notice to 13000 Mansainiks Action against 15000 people
महत्वाच्या बातम्या