शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिलोकेट करावेत.Not to play with the future of the students; Rohit Pawar’s letter to health department over exam confusion
विशेष प्रतिनिधी
पुणे : आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, तसेच सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्य़ातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्य़ातील केंद्र, परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र असे प्रकार समोर आले आहेत.
तसेच परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे.
रोहित पवार म्हणाले-
“एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिलोकेट करावेत,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
“तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा,” अशी मागणीही मांडली आहे.
“उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती,” असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांनी दोन पदांसाठी अर्ज केला असल्याने संबंधित विद्यार्थ्यांला एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे शक्य असताना दोन सत्रांतील परीक्षासाठी दोन वेगळ्या जिल्ह्य़ांतील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे दोन परीक्षांसाठीचे शुल्क भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
Not to play with the future of the students; Rohit Pawar’s letter to health department over exam confusion
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार,अजित पवार यांनी जनतेला लुटलेय आरोप चुकीचे तर सिद्ध कराच – सोमय्या
- उदयनराजेंचे पवारांना क्रिडा संकुलावरून चिमटे उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर नाव न घेता टीका
- आम्ही काटा काढून छापा टाकतो – रामदास आठवले
- दुर्गापूजा विसर्जनात बांगलादेशात हिंदूंची हत्या; बांगलादेशाच्या डेप्युटी हाय कमिशरनेटसमोर कोलकात्यात इस्कॉनचे भजन