विशेष प्रतिनिधी
मुंबई : एमपीएससीची तयारी करणारे लाखो तरूण परीक्षेची वाट बघत आहेत. वारंवार सरकारला एमपीएससी परीक्षांबाबत धोरण सुधारा, तात्काळ परीक्षा द्या असं सांगूनही हे गेंड्याच्या कातडीचं सरकार सुधारत नाही. सरकारला फक्त आदित्य ठाकरे , पार्थ पवार यांच्या करिअरची काळजी आहे. परंतु कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबातून एमपीएससी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअरचं त्यांना काही पडलं नाही. स्वप्निल लोणकर याची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणाने केलेली हत्या आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकारवर केली आहे. Not Swapnil’s suicide but murder, criticism by MLA Ram Satpute
सातपुते म्हणाले की, स्वप्निल लोणकर या तरूणाने जरी आत्महत्या केली असली तरी ती शासनाच्या कुचकामी धोरणाने केलेली हत्या आहे. सरकारचं नाकर्ते धोरण असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. परीक्षेची वाट पाहतायेत. ज्यांच्या परीक्षा झाल्या त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पीएसआय परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेत, त्यांच्या मुलाखतीही झाल्या आहेत. परंतु नियुक्त्या रखडवून ठेवल्या आहेत.
स्वप्निल लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बाईंडिंगचा प्रिटिंग प्रेसचा छोटा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. स्वप्निलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली.
तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आईवडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता.
मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कजार्चा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरून दिसून येत आहे.
Not Swapnil’s suicide but murder, criticism by MLA Ram Satpute
महत्त्वाच्या बातम्या
- सीएम केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींना मागणी, या वर्षी डॉक्टरांना देण्यात यावा भारतरत्न
- भाजप नेत्यांशी भेटीवर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण भारत-पाकिस्तानसारखे नाही
- फिलिपाइन्समध्ये मोठी विमान दुर्घटना, ९२ जणांना घेऊन जाणारे लष्कराचे विमान कोसळले, १७ जण ठार
- सेना-भाजप एकत्र येणार का?, संजय राऊत – आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीवर सुधीर मुनगंटीवारांचे सूचक भाष्य
- Mithali Raj Record : मिताली बनली महिला क्रिकेटची तेंडुलकर, वन डे सामन्यांत सर्वाधिक धावा, कर्णधार म्हणूनही नंबर 1